आता खासगी वाहनचालकांचा सन्मान वाढवणार “सारथी”संघटन


(निलेश जांबले )

दौंड-सासवड (पुरंदर)पुणे
वाहनचालकांसाठी काम करणारी सारथी वाहतूक असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संघटनेची कार्यकारिणी जाहीर झाली आहे...समाजात वाहन चालक हा ठायी ठायी उपयोगी असणारा घटक जो रात्रंदिवस सेवा देण्यासाठी धडपडत असतो. मात्र वाहनचालकाला आज ही समाजात दुय्यम स्थान मिळतं आहे. त्यामुळे खासगी वाहनचालकांचा सन्मान आणि त्यांना ही प्रतिष्ठा मिळाली पाहिजे असे मत शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दिपक काटे यांनी व्यक्त केले आहे. ते सारथी वाहतूक असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी बोलतं होते.

सासवड येथे येथे सारथी वाहतूक असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पदाधिकारी नेमणूक आणि कार्यशाळा आयोजित करण्यात आली या प्रसंगी राज्यातील अनेक विभागातून वाहनचालक उपस्थित झाले होते.सासवड येथील कार्यशाळेचे उदघाट्न शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक काटे यांच्या हस्ते करण्यात आले. सारथी वाहतूक असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून खासगी वाहनचालकांसाठी विमा कवच, चालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, प्रवासात येणारे अडथळे दूर करणे, अपघात प्रसंगी मदत करणे अशा स्वरूपाची प्राथमिक कामं हाती घेण्यात आली आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यात पदाधिकारी नेमणूक करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष योगेश कांबळे, उपाध्यक्ष सुहास महाडीक,सचिव सागर पोमण, खजिनदार राकेश शिंदे, कार्याध्यक्ष प्रशांत राठोड, सेक्रेटरी कल्याण सोनवणे, महाराष्ट्र संपर्कप्रमुख विनोद घुगे, कायदेशीर सल्लागार एडवोकेट जहीर चौधरी साहेब, संचालक ऋषिकेश शिंदे, महेश राऊत, जनार्दन दौंड, जनार्दन नाळे,संजय रोडे,याकुब पठाण,बाप्पु जगताप, राम शाहिर, व आदि कार्यकर्ते राज्यातील वाहनचालकांसाठी काम करणार आहेत.

Post a comment

0 Comments