पुण्यात मराठा आरक्षण मागणीसंदर्भात मशाल आंदोलन


निलेश जांबले दौंड-

पुणे...

 मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरी मधील आरक्षणाला स्थगिती मिळल्यामुळं समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. काळाकुट्ट अंधार तयार झाला आहे. हा अंधःकार दूर करण्यासाठी सरकारला जाग यावी सर्व राजकारण्यांना जाग यावी म्हणून आम्ही मशाल आंदोलन घेत आहोत.

१) मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा.

 २)  राज्यसरकारमधील शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा. 

३)  मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या नव्याने होणाऱ्या सर्व प्रवेश प्रक्रिया मध्ये सरकारने ५०% फी सवलत द्यावी     त्याची जबाबदारी सरकार ने घ्यावी.

 ४) जो पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत पोलीस भरती सह कुठलीही मेघा भरती प्रक्रिया राज्यसरकार ने घेतली जाऊ नये.

 ५) राज्यसरकार ने सारथी ला तात्काळ वाढीव आर्थिक मदत द्यावी.

 ६) MPSC च्या होऊ घातलेल्या परीक्षा संधार्भात मराठा मुलांनी SEBC च्या कोट्यातून फॉर्म भरले आहेत.. त्याचं काय होणार याचा खुलासा तत्काळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या करावा

इत्यादी मागण्या करिता हे आंदोलन करण्यात आले आहे

Post a comment

0 Comments