पत्रकार राम थोरात यांची पैठण तालुका सचिवपदी निवड.


पैठण प्रतिनिधी विजय खडसन ;- रजापूर ता.पैठण येथील राम थोरात हे मागील पाच ते सहा वर्षांपासून पत्रकारितेमध्ये काम करत असून ते जनसामान्यांचे व अनेकांचे हिताचे प्रश्नांना वाच्या  फोडून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी आतापर्यंत आडुळ परिसरातील सर्वांच्या हिताच्या तसेच अन्यायाच्या विरोधात पत्रकारांची करत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

यामुळे पत्रकार राम थोरात यांची केंद्रीय पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कमलेश गायकवाड तसेच औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सचिन बोंबले  व जिल्हा उपाध्यक्ष सिध्दांत कांबळे यांच्या शिफारशीनुसार राम थोरात यांना पैठण तालुका सचिवपदी नुकतेच नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे. आडुळ परिसरात सामाजिक व पत्रकारीता, कला आदी क्षेत्रात कार्यरत असून गुणवत्ता आणि कार्यक्षमता पाहून पत्रकार राम थोरात यांची नियुक्ती केली आहे. 

या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष सचिन बोंबले, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दांत कांबळे, तालुका संपर्क प्रमुख नारायण आगळे,तालुका उपाध्यक्ष शिवनाथ दौंड,रजापूरचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे ,उपसरपंच महादेव भिसे,आडूळचे सरपंच शेख नासेर, उपसरपंच राहुल बनकर, पत्रकार विशाल हुसे,डॉ किरण अलोने,शेख रिजवान,शिवसेना शाखा प्रमुख शेख ईसाक टेलर, स्वप्निल आगलावे, रवींद्र आगळे,सतिष राख,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a comment

0 Comments