फळबाग पीकविमा मंजूर न केल्याने छावा क्रांतिवीर सेनेचे तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणपैठण ( विजय खडसन.) :--   पैठण तालुक्यातील सन 2019 मधील फळबाग पीकविमा सात मंडळात नामंजूर केला आहे . पीकविमा मंजूर करण्यासाठी 22 जुलै , 18 ऑगस्ट , 11 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्या संदर्भात स्मरणपत्र देऊनही पिकविमा संदर्भात कोणतीही कारवाई न केल्याने सोमवार दि 14 सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता तहसीलदार कार्यालयासमोर छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत , मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे
देविदास सोनवणे , अशोक सोनवणे , दामोदर काळे ,देवीचंद्र सोनवणे ,राजेन्द्र काळे ,योगीराज भटके  हे आमरण उपोषण करत आहे  .
         सन 2019 मधील फळबाग पीकविमा उर्वरित सात मंडळात मंजूर करण्यात यावा . राज्यपाल यांनी बागायती फळबागा साठी हेक्टरी 18 हजार रुपये व जिरायती क्षेत्रासाठी 8 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती .त्यापैकी फळबाग अनुदानासाठी शेतकरी वंचित आहे . खाते क्रमांक व नावात दुरुस्ती यामुळे वंचित शेतकरी यांना अतिवृष्टीचे अनुदान लवकर वाटप करण्यात यावे आदी मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे

Post a comment

0 Comments