वैजापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची होणार सरसकट पंचनामे


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :


अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान  झाल्यामुळे शिवूर, वाघाळा, गारज या परीसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीची पाहणी आमदार प्रा रमेश बोरनारे  तसेच संबंधित खात्याचे सर्व क्रुषी अधिकारी तहसीलदार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. 
यावेळी आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना सरसगट नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.शेतकऱ्यांशी संवाद साधून शासनाकडून आपणास योग्य ती मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याचा आश्वासन दिले.
यावेळी उपविभागीय क्रुषी अधीकारी देशमुख, तहसिलदार निखिल धुळधर , उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, ता क्रुषी अधीकारी कुलकर्णी , मा सभापती रामहरी बापु जाधव, बबनतात्या जाधव, प्रभाकर जाधव, नंदकुमार जाधव, संतोष दौंगे,अंबदास खोसे,  कारभारी आण्णा सरोवर, नरेंद्र सरोवर, या परीसरातील सर्व शेतकरी, पदाधीकारी, शिवसैनिक, क्रुषी सहायक उपस्थित होते.

Post a comment

0 Comments