तांबडी येथे हजारो समाजबांधवांनी प्रितीताईला वाहीली श्रद्धांजली.मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा.


रायगड -

रायगड जिल्ह्यातील तांबडी रोहा येथिल प्रिती म्हांदळेकर या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून निघृण हत्या केली.याप्रकरणी आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.माञ त्यांच्यावर चार्जशिट आजुन पर्यंत दाखल करण्यात आलेली नाही.राज्य सरकार व पोलीसांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने आज तांबडी ता. रोहा जि.रायगड येथे प्रितीताईला श्रद्धांजली अर्पण करून लोकशाही मार्गाने कोराना व सोशल डिस्टसिंचे नियम पाळुन शांततेत आंदोलन करण्यात आले.यावेळी रोहा तालुक्यातील हजारो समाजबांधव आयोजित आंदोलनात सहभागी झाले होते.
प्रीती ताईला न्याय मिळाला नाही तर रोहा येथे मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने समाजबांधवांना सोबत घेऊन मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिला.

Post a comment

0 Comments