कमला एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची मनमोहक आरासपंढरपूर - अधिक महिना अर्थात पुरुषोत्तम मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशीला पद्मिनी तथा कमला एकादशी म्हटले जाते. त्यानिम्मित पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज रंगबिरंगी फुलांची मनोहक सजावट करण्यात आली होती. 

पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने या पुष्पसजावटीची छायाचित्रे जारी केली आहेत. 

अधिक महिन्यात शुक्ल पक्षामध्ये आलेल्या एकादशीला पद्मिनी (कमला) एकादशी म्हणतात. दरवर्षी २४ एकादशी असतात. 

अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास येतात तेव्हा त्यांची संख्या २६ पर्यंत वाढते. 

अधिक महिन्यात दोन एकादशी येतात. ज्याला पद्मिनी एकादशी (शुक्ल पक्ष) आणि परम एकादशी (कृष्ण पक्ष) म्हणून ओळखले जाते. 

Post a comment

0 Comments