माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करा – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार


गगापुर (प्रतिनिधी 
प्रकाश सातपुते)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सर्वांनी प्रयत्नपूर्वक यशस्वी करावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल यांनी केली आणि पावसामुळे झालेल्या शेतपिकांचे नुकसान याबाबत आयोजित आढावा बैठकीत सत्तार बोलत होते. यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रा.रमेश बोरणारे,  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी  अण्णासाहेब शिंदे, तहसीलदार अविनाश शिगटे  गटविकास अधिकारी विजय परदेशी वैद्यकीय अधीक्षक बुशरा खान तालुका कृषी अधिकारी तारगे, पाटील आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री सत्तार म्हणाले. आता झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची सर्व पिके , घरे आदींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना दिलेले आहेत. झालेल्या नुकसानीची भरपाई शासन लवकरच नियमाप्रमाणे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही श्री.सत्तार म्हणाले 
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शेतपिकांचे नुकसान झाले आहे, त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरच तयार करून शासनास सादर करण्यात येईल. उर्वरित पंचनामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे यावेळी सांगितले. 

 गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी राज्यमंत्री सत्तार यांनी केली. यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते. गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही यावेळी श्री. सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिली.

Post a comment

0 Comments