महाड एम आय डी सी परिसरात अनाधिकृत बांधकामांचा सुळसुळाट
रायगड - जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीत सध्या अनाधिकृत बांधकामने मोठ्याप्रमाणात होताना दिसत असून यामध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृत रीत्या टप्परी व्यावसायिक वसत असतानाच एम आय डी सी च्या मुख्य रस्त्यावर तर अनेक दुकानदार आपली दुकाने थाटून बसले आहेत तर अनाधिकृत बांधकामात येक शाळा देखील येत असल्याचे दिसून येत आहे तर कंपन्या त्याचप्रमाणे हार्डवेअर दुकानदार अक्षरशः एम आय डी सी च्या भुखंडावर आपले बस्थान मांडून बसले आहेत येवड्यावर न थांबता महाड एम आय डी सी च्या नजरेसमोर असणाऱ्या नांगळवाडी परिसरात तर अक्षरशः येक नगरच शासनाच्या जमिनीवर बसविण्यात आले असून याच परिसरात येक बिल्डिंग देखील एम आय डी सी च्या जागेत बांधली असल्याचे समजते माञ या गोष्टीकडे एम आय डी सी अधिकारी वर्ग जाणून भुजुन दुर्लक्ष करतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे 
विशेष म्हणजे एम आय डी सी मधील टप्परी व्यावसायिक यांना प्रशासनाने टप्परीला चाके लावून धंदा करण्याची मुभा दिली होती माञ आता काही टप्परी धारक प्रशासनाचे सर्व नियम खुंटीला टांगून ठेवत कायम स्वरूपात आपली टप्परी मांडून बसले आहेत त्यामुळे नागरिकांन मध्ये नाराजी वाढताना दिसत आहे 

प्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments