ढोरेगाव ते पेडापूर मुख्य रस्त्याच्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

 ,

गंगापूर (प्रतिनिधी प्रकाश सातपुते) 

ढोरेगाव ते पेंडापूर, भोयगाव या रस्त्यावरील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता तसेच ठेकेदार यांच्या संगनमताने अत्यंत धोकादायक व निकृष्ट दर्जाचे सुरू असून अक्षरशः या पुलाची लांबी कमी करून मुरमाचा भराव करण्यात येत आहे या सुरू असलेल्या पुलाच्या कामाची चौकशी करून अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहे,
गंगापुर तालुक्यातील ढोरेगाव ते पेंडापुर, भोयगाव या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने एक कोटी रुपये मंजुरी दिली आहे या पुलाचे कामही प्रगतिपथावर आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वाय. बी. कुलकर्णी व गंगापूर येथील उप अभियंता हिरासिंग ठाकूर तसेच संबंधित गुत्तेदार यांच्या संगनमताने या पुलाचे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने एक कोटी रुपये पाण्यात जाणार असल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे 
या फुलाच्या सुरू असलेल्या कामात पुलाची लांबी  कमी करुन त्याचप्रमाणे बांधकाम ही निकृष्ट दर्जाचे करून दोन्ही साईटला अक्षरशः मुरमाचा भराव करून बिनबोभाटपणे काम तातडीने करण्यात येत आहे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने येणाऱ्या पुढील वर्षात पहिल्याच पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही साईटने पाण्याच्या प्रवाहामुळे या पुलाचे तीन-तेरा होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यासंबंधित स्थानिक वरिष्ठांच्या  अधिकार्‍याच्या आशीर्वादाने गंगापुर तालुक्यातील रस्ते व पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे या अधिकाऱ्यांना कोणाचाच वचक नसल्याने तालुक्यातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असुन अंदाजपत्रकानुसार करण्यात येत नाही एवढेच नाही तर रस्त्याच्या डागडुजीच्या नावाखाली आतापर्यंत तालुक्यातील अनेक रस्त्यावर थातुरमातुर डागडुजी करून करोड रुपयांचा मलिदा लाटला आहे या फुलाच्या सुरू असलेल्या कामाची चौकशी करून आतापर्यंत डागडुजीच्या नावाखाली करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली याची मंत्रालय स्तरावरून चौकशी करून  संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या विरुद्ध कारवाई करून सुरू असलेले काम अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे

Post a comment

0 Comments