'शहीद जवानामागे एक झाड' सयाजी शिंदेंची संकल्पना

सातारा : प्रख्यात अभिनेते 'सयाजी शिंदे' यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली द्या, अशा उत्कट भावना यावेळी सयाजींनी बोलून दाखवल्या. 
सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अभिनेते सयाजी शिंदे यांनी हा उद्देश समोर ठेवून दुष्काळी माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ‘जय जवान जय किसान’ ही नवीन संकल्पना आणली आहे,
सयाजी यांनी आज वडगाव दडसवाडा या ठिकाणी शहीद जवानांचे कुटुंबिय आणि ग्रामस्थ यांच्यासोबत दुष्काळी भागातील माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. यामध्ये जांभूळ, चिंच, आवळा यांची सुमारे एक हजार पाचशे झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला.

Post a comment

0 Comments