धनगांव येथिल काकासाहेब कणसे यांनी सरकारी रुग्णालय औरंगाबाद येथे चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या
पैठण (वीजय खडसन ):-- पैठण तालुक्यातील धंनगाव येथिल रहिवासी असलेले काकासाहेब कणसे यांनी औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मरुन आत्महत्या केली हि घटना रविवारी दि.२७ रोजी सकाळी घडली या घटनेने पैठण शहरात व धंनगाव मध्ये या घटनेने एकचं खळबळ उडाली आहे काकासाहेब कणसे  वय.४२ वर्षे रा.धंनगाव ता . पैठण असे आत्महत्या करणाऱ्या व्यतीचे नाव आहे काकासाहेब हे राष्ट्रीवादी काँग्रेसचे मा.आमदार संजय पा.वाघचौरे याचे खदेसमर्थक म्हणुन तालुक्यात त्यांची ओळख होती
दि. २१ सप्टेबर रोजी काकासाहेब कणसे हे कोरोना पॉझिटिव्ह आडळुन आले होते त्यामुळे त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रविवारी सकाळी त्यांनी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी माहिती दिली . या घटनेने एकच खळबळ उडाली आहे त्यांनी आत्महत्या कशामुळे केली याची माहिती मिळू शकली नाही कणसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनमिळावू पदाधिकारीअसल्यामुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a comment

0 Comments