महाड मधील तारीक गार्डन इमारत दुर्घटनाग्रस्तांना अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट च्या वतीने दिलासासंसार उपयोगी साहित्याचे केले वाटप

महाड  - मधील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेतील सर्वस्व गमावलेल्या दुर्घटनाग्रस्तांसाठी महाडमधील अंजुमन दर्द मंदाने तालीम व तरक्की ट्रस्ट च्या वतीने कोकणा सह परदेशातील विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने आलेल्या संसारोपयोगी वस्तुंचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष मुक्ती रफीक पुरकर होते प्रमुख अतिथी म्हणून डिवाय एस पी शशिकिरण काशिद नायब तहसिलदार कुडल महाडचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव मुख्याधिकारी जीवन पाटील जमा तुल मुस्लिम महाडचे अध्यक्ष अकबर तरे माजी नगराध्यक्ष महमद अली पल्लवकर सौदी अरेबियातील जुबैल कमिटी चे सदस्य हानिफ पुरकर महाड शहर शिवसेनाप्रमुख नितीन पावले दुर्धटनाग्रस्त रहिवाशांच्या कमिटीचे सदस्य बशीर चिचकर अख्तर पठाण संस्थेचे पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी मुक्ती पुरकर यांनी संस्थेच्या वतीने ही दुर्घटना घडल्या नंतर तातडीने दुर्घटना ग्रस्तांना तातडीने प्रत्येकी १० हजाराची मदत पुढे केली त्यांचा संसार पुन्हा उभे करण्यासाठी विविध संस्थांना मदती साठी आवाहन करीत या दुर्घटना ग्रस्तांना कपाट फ्रीज गॅस शेगडी वॉशिंग मशिन लॅपटॉप आदी संसारोपयोगी वस्तुंच वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले
डिवायएसपी काशिद यांनी तारीक गार्डन दुर्घटनाग्रस्तांसठी अंजुमन दर्द मंद ही संस्था देवा सारखी धावून आली आहे कोकणासह राज्यात पर राज्यात कुठेही कसलीही आपत्ती आली तर ही संस्था मानवतेच्या भावनेतून मदतीचा हात देत असते या संस्थेच्या कार्याचा आदर्श सर्वच सामाजिक संस्थांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले
प्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments