पोलादपुर मध्ये जलस्वराज्य २ योजनेचे तिन तेराशासनाचा अजब कारभार योजने अंतर्गत झालेल्या टाक्या भरपावसात खाली

योजना अपूर्ण असताना पूर्ण झाले असल्याचे दाखले 
रायगड - जिल्ह्यातील पोलादपुर तालुका हा दुर्गम डोंगराळ असून पावसाळा संपताच या तालुक्यातील बहुतांशी गाव वाड्यांना भीष्ण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते याच पार्श्वभूमीवर पोलादपुर तालुक्यातील अनेक गावाना पाणी टंचाई मधून मुक्त करण्यासाठी शासनामार्फत स्वराज्य २ अंतर्गत योजना देण्यात आल्या कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले माञ या योजने अंतर्गत झालेल्या टाक्या कुचकामी ठरल्या असून जवळजवळ सह ठिकाणी उभारण्यात आलेल्या टाक्यांमध्ये पाणी साठा होत नाही त्यामुळे नागरिकांना या योजनेचा आजतागत कोणत्याही प्रकारचा फायदा झाला नाही
 
माञ आता पंचायत समिती मार्फत या सर्व ग्रामपंचायतीना येक ठराव पाठवण्यात आला असून हा ठराव म्हणजे सरळसरळ दिशाभूल आहे यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की संबंधित जलस्वराज्य २ ही योजना परिपूर्ण असून त्या पासून सर्वांना पाणी पुरवठा होत आहे.त्यात कहर म्हणजे या रेडिमेड ठरावात असे नमूद करण्यात आले आहे की या योजनेची पाहाणी ग्रामीण पुरवठा जिल्हा परिषदेचे श्री.वसंत राठोड (समाज व्यवस्थापन तज्ञ) अधिकारी /तज्ञ यांनी केली असल्याचे दाखविले आहे तर माञ ही योजना सुरूवातीला नारळ फोडून ठेकेदार गेल्यानंतर साधा ठेकेदार सुद्धा या ठिकाणी फिरकला नाही तर अधिकारी तर आलेच नाहीत मग असे खोटे नाटे ठराव करून प्रशासन नेमके काय साध्य करणार आहे हाच मुलात नागरिकांना पडलेला प्रश्न आहे त्यात कहर म्हणजे ही योजना पूर्ण झाली असून ती संबंधित ग्रामपंचायतीनी हस्तांतरण करून घ्यावी असा तगदा लावण्यात येत आहे त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच देखील संभ्रमात पडले आहेत जर योजना पूर्ण नाही नागरिकांना यातून पिण्यासाठी येक हंडा पाणी मिळत नसेल तर आम्ही ही योजना हस्तांतरीत कशी करून घ्यायची असा गंभीर प्रश्न या ग्रामपंचायत सरपंचाना देखील पडला आहे जर ही योजना पूर्ण झाली असा दाखला ग्रामपंचायत मार्फत देण्यात आला तर सहाजिकच या सर्व ग्रामपंचायत टेंकर मुक्त म्हणून गिणल्या जातील आणि पाणी टंचाई काळत पाण्या वाचून वंचित राहावे लागेल याची भीती या गावातील ग्रामस्थांना  भेडसावत आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व सरपंच आंदोलन करू असा इशारा सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे 
त्यामुळे गंभीर अशा पाणी प्रश्नावर शासन किती गंभीर आहे हे दिसून येत आहे 

प्रतिनिधी सुरेश शिंदे रायगड

Post a comment

0 Comments