छावा क्रांतिवीर सेनेचे उपोषण मागे तहसील व कृषी कार्यालयाचे संयुक्त अहवाल शासनास सादर करण्याचे लेखी आश्वासन


पैठण -
दि.१४/०९/२०२० रोजी पासून छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल पा. राऊत यांचे उपोषण तहसील कार्यालय येथे सुरू होते. आज दि.१५/९/२०२० रोजी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेब व तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट साहेब हे उपोषण कर्त्याच्या सन २०१९ मधील फळबाग पीक विमा (मृग बहार) मंजूर करण्याच्या मागणी संदर्भात तहसील व कृषी कार्यालयाचा संयुक्तिक अहवाल शासनास सादर करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते   मागे घेण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे, कल्याण भुकेले, ऍड सुभाष खडसन, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावने, देविदास सोनवणे, दामोदर काळे, अशोक सोनवणे, देवीचंद सोनवणे, राजेंद्र काळे, योगीराज भालके, ज्ञानेश्वर वतारे, याकूब पठाण, एकनाथ भोसले, नाना भाकरे, अप्पासाहेब गवारे, परमेश्वर जाधव, विशाल व्यवहारे, परमेश्वर गरड, रोशन भोसले, निखिल कातबाने, सोहेल शेख, रामेश्वर कपटी, आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments