उपजिल्हा रुग्णालयाची जनतेला खरोखर गरज - अनिता पा. वानखडे


पैठण -

पैठण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र पैठण या पैठण तालुक्यात विविध संत महात्म्य यांचे स्मारक समाधीस्थान व स्मृति स्थान आहेत परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पैठण  शहरात  असलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्यविषयक सेवा नसल्याचे चित्र गेल्या पंचवीस ते तीस  वर्षापासून दिसून येत आहे  आरोग्य विषयी कुठलीही ही अस्मिता असल्याचे चित्र समोर येत नाही देशभरात नावलौकिक असलेले क्षेत्र पैठण येथे आरोग्यसेवेचा अभाव हा वारंवार दिसून येतो श्रीक्षेत्र पैठण तालुका असून अवतीभवत असलेल्या गावांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात व पैठणच्या शहराच्या  लोकसंख्येच्या प्रमाणात व कोवीड 19 या   महामारी सारख्या आजारात उपजिल्हा रुग्णालय असणे अत्यंत गरजेचे आहे परंतु आजपर्यंत स्थानिक लोकनेते राजकारणी व शासन-प्रशासन यांनी कोणीही या गोष्टीची गंभीरता समजून घेतलेली नाही श्रीक्षेत्र पैठण येथे शासकीय रुग्णालयाच्या नावावरती एक प्रशिक्षण केंद्र चालवले जाते या प्रशिक्षण केंद्रात असलेल्या सुविधा किंवा सुविधेचा अभाव यामुळे परिसरातील लोकांना आरोग्याच्या संदर्भात कुठल्याही सुविधा मिळत नाही याच सविधान मध्ये सगळ्यात खेदाची बाब म्हणजे रुग्णालयात आणलेले एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर त्याचे शवविच्छेदन हे शौचालयाच्या रूम मध्ये केले जाते यापेक्षा खेदाची बाब असू शकत नाही या सर्व गोष्टी लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपणार्‍या व लोकांच्या आरोग्याच्या संदर्भात पैठण तालुक्यातील व शहरातील  जनतेची हाक  म्हणून सरकारला पैठण तालुक्यातील दुरवस्थेकडे पाहण्यास प्रवृत्त करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता व राजकीय नेत्या अनिता पा. वानखडे यांनी या पैठण तालुक्यातील लोकांच्या आरोग्यासाठी शासनाने पैठण येथे उपजिल्हा रुग्णालयाची मान्यता देऊन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे याकरिता आरोग्य विभाग जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना पैठण तालुक्यातील जनतेची मागणी करणारे निवेदन दिलेले आहे त्याचबरोबर मतदारसंघातील आमदार साहेबांनी तालुक्यातील व शहरातील  जनतेच्या आरोग्याचा विचार करून सरकारकडे उपजिल्हा रुग्णालयात आग्रह धरून तो मान्य करून घ्यावा अशी जनतेतून मागणी आहे
स्टेटमेंट
स्थानिक स्तरावर काम करत असलेल्या प्रशिक्षण केंद्रात सुविधांचा अभाव आहे हे विचारले असता सदरील प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी हे सांगतात हे रुग्णालय नाही हे प्रशिक्षण केंद्र आहे त्यामुळे इथे या गोष्टी आहेत तिथपर्यंतच आम्ही आपणास सेवा देऊ शकतो त्या पुढे आम्हाला काहीही करता येत नाही
आज पर्यंत पैठण तालुक्यातील जनतेस प्रशिक्षण केंद्र आहे का  व ग्रामीण रुग्णालय आहे  . कळाले   नाही ज्यावेळी या सुविधेचा अभाव का आहे हे विचार न करता सामाजिक कार्यकर्त्या  व राजकीय नेत्या सौ अनिता पा. वानखडे या गेल्या असता हे  रुग्णालय नसून प्रशिक्षण केंद्र आहे या गोष्टीचा उलगडा झाला तोपर्यंत कोणालाही हे रुग्णालय नसून प्रशिक्षण केंद्र आहे ही बाब माहीतच नव्हते 
ही गोष्ट अनिता पा. वानखडे  यांना समजताच त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून  उपजिल्हा रुग्णालय किती परिसरात उपजिल्हा रुग्णालय किती आवश्यक आहे हे सांगणारे निवेदन तयार करून संबंधित विभागांना दिले व यापुढे त्या हेही म्हणाल्या की जोपर्यंत पैठण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय स्थापन होत नाही तोपर्यंत मी वैयक्तिक या गोष्टीचा पाठपुरावा करणार असून स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भेटणार आहे व पैठण तालुक्यातील जनतेची दुरावस्था कशा पद्धतीने होत आहे हे सांगून आत्तापर्यंत केवळ सुविधेचा अभाव असल्यामुळे कित्येक जणांचे जीव गेले आहेत सद्यस्थितीत पूर्ण प्रादुर्भावाची परिस्थिती असून या परिस्थितीतही पैठण तालुक्यातील व शहरातील लोकांना प्रशिक्षण केंद्रावर तीच आपल्या आरोग्याची जिम्मेदारी द्यावी लागत आहे मतदार संघातील आमदार साहेबांनी या गोष्टीकडे आज पर्यंत का लक्ष दिले नाही हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे जे काम स्थानिक लोक नेत्यांचे आहे ते काम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा अनिता वानखडे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत त्यांच्या या प्रयत्नाला निश्चितपणे यश येईल असे पैठण परिसरातील जनतेची खात्री आहे

Post a comment

0 Comments