महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाचा अजब कारभारदूषित पाणी सोडणाऱ्या इप्का कंपनीची प्रदूषण कंट्रोल बोर्डाकडुन पाठराखण


रायगड -जिल्ह्यातील महाड एम आय डी सी ही केमिकल्स युक्त कारखान्यानी भरलेली एम आय डी सी असून या एम आय डी सी मध्ये काही मोजके कारखानदार हे आपले दूषित पाणी नदीच्या पाञात खुलेआम सोडताना दिसत आहेत माञ यामुळे आज नदीच्या पाञातिल शेकडो मासे म्रुत्यु मुखी पडत आहेत तर हेच पाणी एम आय डी सी आणि आजुबाजुच्या नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केला जात आहे माञ प्रदूषण कंट्रोल बोर्डाचे अधिकारी माञ बघ्याची भूमिका घेत आहेत असे दिसून येत आहे त्याचे कारण म्हणजे महाड एम आय डी सी मधील ईप्का लॅबोरेटरी या कारखान्यातून सतत एम आय डी सी मधील टेमघर नाळ्यात आपल्या कंपनीचे दूषित पाणी सोडले जाते या कंपनी बद्दल अनेक तक्रारी करून देखील प्रदूषण कंट्रोल बोर्डाचे अधिकारी माञ मुग गिळून गप्प बसत आहेत याच कंपनीने येकाच महिन्यात तीन वेळा नदीच्या पाञात तेरा ते चौदा पि एच असे अतिशय दूषित पाणी सोडताना आढलून देखील प्रदूषण कंट्रोल बोर्ड माञ कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांन मध्ये प्रदूषण कंट्रोल बोर्डाच्या अधिकाऱ्यांनवर मोठा असंतोष निर्माण झाला असून जर महाड एम आय डी सी मधील प्रदूषण कंट्रोल बोर्ड दूषित पाणी सोडणाऱ्या कंपन्यानवर कारवाई करणार नसेल तर हे प्रदूषण कार्यालयाला टाळे ठोका अशी मागणी नागरिक करत आहेत

प्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments