कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी काेकणात आझाद हिंद संघटनेकडुन माणगांव तालुक्यात आंदोलन.


 रायगड (माणगाव)

            केंद्र सरकारने कांद्यावर घातलेली निर्यातबंदी उठवावी व निर्णयाचा पुन्हा विचार व्हावा याकारिता आझाद हिंद संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कडुन 15 सप्टेंपासुन राज्यव्यापी आंदाेलनाला सुरुवात झाली आहे यामध्ये माणगांव तालुका पदाधिकाऱ्यांकडुन तहसिलदारांना निवेदन देखील देण्यात आले हाेते मात्र 22 सप्टेंबर राेजी माणगांव तालुक्यातील लाेणेरे हद्दीत पन्हळघर फाट्यावर मुंबई-गाेवा महामार्गावर आझाद हिंद संघटनेकडुन कांद्याच्या माळा गळ्यात घालुन व कांद्याची हाेळी करुन व सरकार विराेधी घाेषणा "इन्कलाब जिंदाबाद" "भारत माता की जय" घाेषणा देत आझाद हिंद संघटनेकडुन सरकारचा निषेध नाेंदविला गेला व यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र झाेरे,संदेश पवार,संदीप कदम ,काेंडीराम काेकरे ,विजय शिंदे व बहुसंख्य आंदाेलनकर्ते उपस्थित हाेते ,कांदा निर्यातबंदीविराेधात काेकणात हाेणारे हे पहीलेच आंदाेलन असल्याचे बाेलताना काेकणातील शेतकरी कांदा पिकवत नसला तरी आहारात कांदा मात्र नेहमीच वापरत असल्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेची पिळवणुक थांबवावी ,अन्यथा संघटनेचे राज्य अध्यक्ष अँड.श्री.सतिश राेठे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदाेलन सुरु राहणार असल्याचे उपस्थित आंदाेलनकर्त्यांनी  सांगितले. 

प्रतिनिधी, रिजवान मुकादम 
मराठा तेज ब्युरो, माणगाव, रायगड.

Post a comment

0 Comments