वासुंदेत मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकाराचा मृत्यू


वासुंदे(दौंड)
निलेश जांबले

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिंकारा जातीच्या हरणाचे पाडस जखमी झाले असून स्थानिकांनी या हरणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करून त्यास
जखमी पाडस वन विभागांच्या अधिकाऱ्यांनच्या ताब्यात दिले...
वासुंदे येथील गट नंबर ६९ मध्ये मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने  हल्ला केला मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी त्यास  वाचविले ...
पुढिल उपचारासाठी वन विभागाचे कर्मचारी यांच्या कडे पाडस देवून दौंड येथील पशुवैद्यकीय विभागाकडुन उपचार केले जातील असे सांगण्यात आले...मात्र उपचारादरम्यान पाडसाचा मृत्यू झाला तद् नंतर शवविच्छेदन करण्यात येणार असुन नंतर विल्हेवाट लावली जात असते असे वनरक्षक कोकरे यांनी सांगितले...
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची वन्यप्रेमीची वारंवार मागणी करत आहेत मात्र परिस्थिती जैसे थे असल्याने मागील सहा महिन्यांपासून आठ ते दहा चिंकाराचां फाडशा याच मोकाट कुत्र्यांनी पाडला आहे असे स्थानिक सांगत आहेत त्यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे....

Post a comment

0 Comments