मराठा क्रांती मोर्चा दौंड तालुका व शहर यांच्या वतीने शांततापूर्ण आंदोलन....


निलेश जांबले

 दौंड-पुणे
 : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजात निर्माण झालेल्या अस्वस्थेकडे दौंड शहर व तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून शांततापूर्ण मार्गाने शासनाचे लक्ष वेधण्यात आले. 
                      शहरातून दुचाकी रॅली काढून मराठा समाजातील तरूणांनी दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मराठा आरक्षण खंडित होऊ नये याकरिता आवश्यक कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब करणे, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापूर्वी झालेले शैक्षणिक प्रवेश, सवलती आणि राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या निवडींना संरक्षण देणे, स्थगिती आदेशानंतर जाहीर करण्यात आलेल्या पोलिस भरती संबंधी राज्य शासनाने भूमिका स्पष्ट करणे, आदी मागण्या करण्यात आल्या.....

Post a comment

0 Comments