पैठण तालुक्याला पावसाने अक्षरशः झोडपले, कातपुर येथिल पुलावरुन पावसाचे पाणी ४ ते ५ फुटाने गेल्याने नागरीकांची रहदारी बंद


पैठण (प्रतिनिधी विजय
 खडसन)

पैठण तालुक्यात काल रात्री पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. काल रात्र भर पावसाने दमदार हजेरी लावल्याने पैठण शहरात सखोल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील बस स्थानक परिसरातील दूकांनात अक्षरशः ४ ते ५ फूट पाणी होते त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील कहारवाडा परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरून घरगुती सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सखल भागात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. 

ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचले असून शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. कातपुर  गावातील नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने नारायणगाव, गेनतपूर, पाचलगाव, वरुडी, कासार पाडळी, नानेगाव, पूसेगाव, तुपेवाडी, कडेठान, गावतांडा, खामगाव, बालानगर इत्यादी गावाचा पैठणला येण्यासाठी ह्याच कातपुर नदी वरिल पुलावरून होत होता पण तो पूल पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. या पुलाचा अनेक वेळा नुसते भूमिपूजन झालेले आहे मात्र पूल काही बनवण्यात आला नाही. निवडणूकीच्या तोंडावर नेते मंडळी नुसता भूमी पूजनाचा घाट घातला जातो पण प्रत्यक्षात मात्र पुलाचे काम आजपावेतो झालेले नाही म्हणून आज ही परीस्थिती या गावच्या लोकांवर ओढवली आहे. या पुलाचे भुमिपुजन,शिव सेना मा. मंत्री.संदीपान भुमरे यांनी ३ वेळा भूमिपूजन केले,आहे व माजी आमदार संजय वाघचौरे यांनी २ वेळे तर खासदार रावसाहेब दानवे यांनी २ वेळेस भूमीपूजन केले आहे. निवडणुकी पुर्वीचं भूमीपूजन केले जाते नंतर त्याचा विसर नेते मंडळीला  यांना पडतो असे कातपुर येथिल गावकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे

Post a comment

0 Comments