धानोरा येथे शेतीशाळा ऊत्साहात


सिल्लोड-. भराडी. येथे आयोजित शेतीशाळेत शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके व रब्बी हंगामातील पिकांची लागवड व काढणे आधुनिक पद्धतीने कशी करायची याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी डॉ मोटे उपविभागीय कृषी अधिकारी चव्हाण तालुका कृषी अधिकारी दिपक गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी शेतीशाळा घेण्यात येत आहे. धानोरा येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री सुरेश पवार यांनी शेतकऱ्यांना शून्य मशागत तंत्राने (SRT) फायदे याबद्दल मार्गदर्शन केले खरीप पिकांची काढणी रब्बी पिकाची नियोजन याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले शेती शाळा प्रशिक्षण  रामेश्वर वराडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना 2%DAP ची   फवारणी करणे तसेच करती हरभरा लागवड याबद्दल माहिती दिली यावेळी धानोरा गावातील कृषी मित्र आदिनाथ काकडे, हरिचंद्र काकडे, विष्णू खंबाट, दशरथ काकडे, विठ्ठल काकडे, गणेश काकडे, साळुबा काकडे, रामदास काकडे, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a comment

0 Comments