दौंड मध्ये वाळु माफियांचा उच्छांद...


निलेश जांबले दौंड-पुणे,
दौंड तालुक्यातील मलठण, वाटलुज, परिसरात मोठ्या प्रमाणात दिवसरात्र राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू झाले‌ आहे, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी कारभार स्वीकारल्यानंतर लगेच वाळूमाफियांनी डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे या भागात चर्चांना उधाण आले असून वाळू माफियांवर कारवाई होणार का असा सवाल स्थानिक करत आहेत....

दौंड तहसीलदार संजय पाटील यांनी मागील काळामध्ये कानगाव चे  गावकामगार  तलाठी यांना वाळू माफियांना मदत केल्याच्या कारणास्तव व वाळू माफियांवरती कारवाई न केल्याच्या निमित्ताने कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई केली होती. 
मात्र रावणगावचे मंडळाधिकारी श्री मंगेश नेवसे हेही येथील वाळू माफियांना मदत करत असून, वाळूमाफियांसोबत भागीदारी करत आहेत.मात्र त्यांच्यावरती ना उपविभागीय अधिकारी कारवाई करतात, ना तहसीलदार संजय पाटील कारवाई करतात. त्यामुळे नेवसे व वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये मिलीभगत असतील का असा सवाल अनेकांना पडत आहे...
संपूर्ण लॉक डाऊन काळामध्ये मंगेश नेवसे यांच्या कृपाशीर्वादाने वाळु माफियांना सुगीचे दिवस आलेले होते.तदनंतर नवनिर्वाचित जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी पुणे जिल्हाधिकारी कागदाचा कार्यक्रम घेताच कारवाई होईल अशी आशा होती तरीही प्रशासनाला आव्हान देत खुलेआम दिवस-रात्र वाळूचा सुरू आहे त्यामुळे या वाळुउपशातून मंगेश नवसे यांनाही वाळूमाफियांकडुन चांगलेच लक्ष्मी दर्शन  होत आहे... त्यामुळे नेवसे यांचा रुबाब भलताच वाढलेला आहे,यांची तरी दखल घेऊन तरी वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे....

Post a comment

0 Comments