मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश दादा पाटील यांनी खासदार संभाजीराजे यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

सातारा : मराठा समाजाला  EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटकांत समावेश न करण्याबाबतची खासदार संभाजीराजे यांची भूमिका चुकीची आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील  यांनी दिली. ते साताऱ्यात बोलत होते. येत्या १० ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या ३ मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा सुरेश पाटील यांनी दिला. 

 यांनी EWS मध्ये अनेक जाचक अटी असल्याचं सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. ही भूमिका मुख्यमंत्र्यांनीही मान्यही केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. मात्र आता मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांना संभाजीराजेंची ही भूमिका मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण लढ्यातील विसंवाद पुढे येताना दिसत आहे.
सुरेश पाटील म्हणाले, संभाजीराजे यांनी EWS मागणीबाबत घेतलेली भूमिका चुकीची आहे.

Post a comment

0 Comments