सेहगल फाउंडेशन कडून अद्रक पिकातील मूळकूज व कीड व्यवस्थापना बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन


फुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे)


फुलंब्री तालुक्यातील निधोना गावातील 80 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मिळून 200 एकर पेक्षा अद्रक पिकाची लागवड केली आहे
आद्रक पिकावर मूळकूज व करपा या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून त्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत  आहे,त्याचे नियोजन एकात्मिक रित्या कसे व्यवस्थापन करायचे तसेच विविध जैविक बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची माहीत MGM कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ श्री तुषार चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिली , अद्रक पिकाचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन , बेणे निवड, जमिनीतील सेंद्रिय कर्व कसे वाढवता येईल याविषयीचे मार्गदर्शन  श्री अवचट साहेब विशेष विषय तज्ज्ञ उद्यान विद्या mgm कृषी विज्ञान केंद्र गाधेली यांनी केले. कापूस पिकावर होणार अति खर्च घरच्या घरी उपलब्ध साधनातून कसा कमी करता येईल तसेच कमी खर्चात हुमिक ऍसिड घरी कसे बनवावे तसेच कपाशीत येणारा लाळ्या रोग कसा ओळखावा व त्याचे कसे नियंत्रण करावे  याविषयीचे मार्गदर्शन  एस एम  सेहगल फाउंडेशन चे कृषी तज्ज्ञ श्री योगेश सिंगारे यांनी दिले
सेहगल फौंडेशन  च्या माध्यमातून निधोना येथे शेतकरी कार्यशाळेचे  आयोजन करण्यात आले होते.
     एस एम सेहगल फाउंडेशन च्या माध्यमातून शेती विषयक विविध उपक्रम GRG प्रकल्पा अबतर्गत फुलंब्री तालुक्यामधील 10 गावांमध्ये राबविण्यात येथ त्याचाच एक भाग म्हणून ह्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
सादर कार्यक्रम शेतकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते तसेच या कार्यक्रमासाठी गावच्या ग्रामपंचायतीने विशेष मेहनत घेतली

Post a comment

0 Comments