पैठण तालुका कार्यकारिणी जाहीर करतांना दिग्गज नेत्यांना डावलले अनेक प्रमुख भाजपा नेत्यांची अनुपस्थितीपैठण ( प्रतिनिधी विजय खडसन )-

 पैठण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी च्या तालुका व शहर कार्यकारिणी नियुक्त करतांना तालुका अध्यक्ष यांनी कोणत्याही प्रमुख नेत्यांना नियुक्ती संदर्भात कुठल्याही प्रकारे कळविले नसल्याने पैठण तालुका भाजपा
मध्ये नाराजीचा सूर आहे. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या बडया नेत्यांना डावलले कारण विधानसभेसाठी प्रतिस्पर्धी नको असल्याची चर्चा पैठण तालुक्यात होत आहे. येणाऱ्या विधानसभेला डोळ्या समोर ठेऊन ह्या नियुक्त्या केल्या असल्याचे  समोर येत आहे. 

 पैठण कार्यकारिणी जाहीर करण्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे नियोजन न करता ऐन वेळेस फोन करून काही ठराविक मोजक्याच कार्यकर्त्यांना फोन द्वारे सूचना देऊन पैठण येथील शासकीय विश्रामगृह येथे बोलवण्यात आले आणि झटपट कार्यकारिणी जाहीर करून बैठक आटोपण्यात आली. 

कार्यकारिणी जाहीर करतांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य रेखाताई कुलकर्णी, युवा जिल्हा अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुरज लोळगे, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटे, जिल्हा उपाध्यक्ष तुषार शिसोदे, बद्री बापू भुमरे,  कल्याण नाना गायकवाड, डॉ.शांतीलाल राका, कांताबापू औटे, आशीष मापारी, महेश जोशी, योगेश सोलाटे, गोरख चव्हाण,  इत्यादी नेत्यांची अनुउपस्थिती जाणवली असल्याने, पैठण भाजपा मध्ये आंतरिक गटबाजी तर नाही ना या चर्चेला पैठण तालुक्यात उधाण आले आहे.


भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करतांना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार भागवत कराड, माजी विधान सभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे असे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली मात्र पैठण तालुका कार्यकारिणी जाहीर करतांना कोणत्याही जिल्हास्तरीय नेत्याला तर बोलावले नाहीच परंतु स्थानिक प्रमुख नेत्यांची अनुउपपस्थिती ही प्रामुख्याने जाणवली.

Post a comment

0 Comments