आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. संसदेचं हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये कोविड १९ प्रोटोकॉलची खास काळजी घेण्यात आलीय. सत्रादरम्यान कोणतीही सुटी देण्यात आलेली नाही. १४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात सलग १८ बैठकींचं आयोजन करण्यात आलंय. 
प्रश्नाकाळाचा संसद प्रणाली खूप महत्त्व आहे. प्रश्नकाळ हा सदनाचा आत्मा आहे. प्रश्नोत्तराचा तास हटवून लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी असं पहिल्यांदाच होतंय जेव्हा लोकसभेचे सदस्य राज्यसभेत आणि राज्यसभेचे खासदार लोकसभेत बसत आहेत. पुन्हा एकदा सुरूवात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून एक चिठ्ठी आणि डीआरडीओची कीट सर्व खासदारांना पाठवण्यात आली. यामध्ये मास्क, सॅनिटाईजर आणि इम्युनिटी वाढवणारा चहा आणि करोनापासून बचावाचं मॅन्युअल यांचा सामावेश आहे.

 सकाळी ९.०० वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात झाली. सदनात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर संसदेचं कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आलंय.
करोना संकटामुळे लोकसभा आणि राज्यसभेचा कामकाजाची वेळ वेगवेगळी असेल. लोकसभेचं कामकाज पहिले दोन दिवस सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत दुपारी ३.०० ते ७.०० वाजेपर्यंत हे कामकाज होईल.

तसंच राज्यसभेचं कामकाज १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत होईल परंतु, १५ सप्टेंबरपासून कामकाज सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत होईल.

Post a comment

0 Comments