लाॅकडाऊन मध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांना काय दिले?- संभाजी ब्रिगेड

दौंड(पुणे)
निलेश जांबले 
जागतिक आपत्ती कोरोना व्हायरस संसर्गामुळे अनेक उद्योगधंदे,व्यवसाय, व्यापार, अडचणीत आले असून केंद्र सरकार कडून आत्मनिर्भर पॅकेज देण्याची घोषणा झाली. याचा फायदा तळागाळातील सर्वसामान्य जनतेला झालेला दिसत नसून, वंचित घटक शेतकरी कष्टकरी वाहनधारक छोटे उद्योजक यांना लॉकडाऊन काळामध्ये मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला असुन शेतकरी मात्र पुरता भरडला गेला आहे.
दूध प्रश्न-
मागील सरकारच्या काळांमध्ये दूध प्रश्न हा मुद्दा प्रामुख्याने शेतकऱ्यांनी आक्रमक करत तत्कालीन फडणवीस सरकार मधील दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दुधाला अनुदानाचा सकारात्मक निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला होता....
तत्काळपेक्षा आज राज्यांमध्ये दूध प्रश्न प्रचंड अडचणीत आला असून सध्या सरकार मात्र आपत्तीच्या नावाखाली वाटाघाटी करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे याचीच दखल घेत एक ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर विरोधी पक्षांनी दूध दर आंदोलन केले मात्र यावर अद्याप सकारात्मक तोडगा निघाला नाही.... लॉक डाऊन मध्ये भरडला गेलेला दूध उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होत असून संकटांच्या जाळीत गुतला आहे. त्यातुन बाहेर काढण्यासाठी शासकीय मदत मिळणे गरजेचे असून त्या संदर्भातील कारवाई होण्याची माफक अपेक्षा शेतकरी करत आहेत....

फुल शेती व्यवसाय...
लॉक डाऊन मध्ये फुल शेती व्यवसाय पूर्णपणे मोडला असून विवाह वास्तुशांती उद्घाटन यात्रा यासारखे हौसेचे सणवार  रद्द झाल्यामुळे फुल शेती सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. फुल शेतीस शासनाने अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार राहुल कुल यांनी केली असून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही....

भाजीपाला...
अनेक भाजीपाला वर्गीय नाशवंत पिके शेतकर्‍यांनी कवडीमोल भावाने विकावे लागत असून यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प ही फायदा झालेला नसून शेतकरी उत्पादित झालेली पिके विक्रीसाठी असणारी बाजार पेठ मंदीच्या खाईत ओढलेली आहे त्यामुळे तरकारी भाजीपाला वर्गीय उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासन मदतीची गरज आहे....
चौकट:-
शासकीय अन्नधान्य वितरणाचा बोजवारा...
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून लॉकडाऊन काळामध्ये गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य पुरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला,मात्र वंचित घटकापर्यंत हे अन्नधान्य पोहोचले की नाही यावर काम करणारी कोणतीही सक्षम यंत्रणा प्रशासनाकडे नसून अन्नधान्य पुरवठा विभाग आणि भ्रष्टाचार हे एक समीकरण असून यावरती एखादी समिती नेमून कायदेशीर चौकशी केल्यास आणि गौडबंगाल उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही....

वैद्यकीय सेवा... 
गोरगरीब कष्टकरी ग्रामीण भागातील जनतेसाठी  वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना ही प्रामुख्याने जीवनदायी आहे... मात्र या योजने अंतर्गत कोरूना संसर्ग झालेल्या रुग्णास व्हेंटिलेटर लावल्यास या योजनेचा लाभ होऊ शकतो असे वारंवार माध्यमांकडून दाखवले जात आहे किंवा कॉर्न संसर्ग झालेल्या रुग्णास खाजगी हॉस्पिटल मधून उपचारार्थ डावलले जाते मात्र याबाबत शासनाने एकदाही अधिकृत आकडेवारी दिलेली नाही या वृत्ताचा शासन नेहमी दुजोरा देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते आहे...

लॉकडाऊन मध्ये शेतकरी पुर्णतः उध्वस्त झालेला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही. त्यात महाराष्ट्रात ६ महिन्यांमध्ये १००० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं तरी या सरकारने एक रुपयाही नुकसान भरपाई दिलेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री मागण्या घेऊन गेलं तर अरेरावीची भाषा करतात. सरकारला पत्रव्यवहार केला तरी त्यावर निर्णय घेतला जात नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार उध्वस्त झालेला असताना स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन स्वतः व कुटुंबाला जगवत आहे. शेतकऱ्यांची पोर रस्त्यावर आलेली आहेत. मात्र तीन पक्षांच्या सरकारला याचं काहीही देणंघेणं नाही. शेतकरी जगला तरच हा देश समृद्ध होऊ शकतो अन्यथा हे नेते भांडवलदारांना आपला महाराष्ट्र विकुन टाकतील... अशी परिस्थिती सध्या आहे. परंतु आम्ही रस्त्यावरचे सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून संघर्ष करत राहू...
- संतोष शिंदे,
मा.जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.

या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असून दूध उत्पादन प्रश्न पाहिला तर 15 मार्चपर्यंत त्याला 28 रुपये दरम्यान भाऊ होता मात्र 15 मार्च 31 मार्च दरम्यान दुधाची किंमत 18 ते 20 रुपये पर्यंत झाली...
 सरकार आधार वाटावे असं काम करावं शेतकऱ्यांना वाटत असताना ती गाडीच्या नियोजन शून्य कारभारामुळे शेतकऱ्यांना सरकारने आणखी अडचणीत आणले, धान्याच्या हमीभाव खरेदी धोरणाप्रमाणे फळे दूध पालेभाज्या नाशवंत पदार्थ हमीभावाने खरेदी करण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असताना राज्याच्या सरकारने त्याबाबत मागणीच केली नसल्याने शेतकरीनं प्रति असलेलं पुतना मावशीचे प्रेम दिसून येत आहे...
वासुदेव काळे
सरचिटणीस भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा

Post a comment

0 Comments