बारामतीत केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यासंदर्भात संभाजी ब्रिगेड कडुन निवेदन....

निलेश जांबले दौंड
-पुणे...
संभाजी ब्रिगेड बारामती कडुन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा व राज्य सरकारने जो पर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये या मागण्यांची निवेदने संभाजी ब्रिगेड बारामती तालुक्याच्या वतीने देण्यात आले आहे....

          दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी वाणिज्य मंत्रालय भारत सरकार द्वारा तात्काळ कांदा निर्यात बंदी करण्यात यावी ही जाचक सूचना देण्यात आली. या अनुषंगाने दिनांक 14 सप्टेंबर 2020 हा सबंध भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी काळा दिवस ठरला आहे. ठासळलेली अर्थव्यवस्था, करोना महामारी, नेहमीचा दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी, कर्जबाजारीपणा, बोगस बियाणे, जीएसटी, नोटाबंदी इत्यादी संकटांनी शेतकरी त्रासलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. भारतामध्ये शेतकरी कष्ट करून उत्पन्न घेतात. आज कसातरी कांद्याला चांगला भाव मिळत आहे परंतु योग्य भाव शेतकऱ्यांना मिळत असताना शासनाच्या ह्या अन्यायकारक निर्णय यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. 'शेतकर्‍याचे मरण हेच सरकारचं धोरण' हे कांद्याची निर्यातबंदी करून सरकारने सिद्ध केलं आहे. केंद्र सरकारने त्वरीत कांदा निर्यात बंदी उठववी.

         तसेच महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 ला दिलेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला जबर फटका बसला आहे. मराठा समाज कायम आरक्षणापासून वंचित राहिला आहे. तेव्हा आता मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरुपाची शासकीय भरती करण्यात येऊ नये. सध्याचे आरक्षण कायम ठेवण्याचा अध्यादेश सरकारने काढवा व आरक्षण लाभ चालू ठेवावा. अशा मागण्यांची दोन निवेदने संभाजी ब्रिगेडच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले. जर या मागण्या मान्य नाही झाल्या तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. या प्रसंगी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष विनोद जगताप, उपाध्यक्ष तुषार तुपे, संघटक सोमनाथ जाधव, संघटक विशाल भगत, संकेत जगताप, दत्तात्रय साबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a comment

0 Comments