गंगापूर
(प्रतिनिधि प्रकाश सातपुते)
कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस गंगापुर तालूका आणि शहरातून रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरीकांनी आरोग्य विभागाकडून दिलेल्या निर्देशाचे पालन करणे गरजेचे असून सुरक्षीत अंतर ठेवावे मास्क सॕनिटायझर चा वापर करावा वारंवार हात धुवावेत गर्दीत जाणे टाळणे स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घ्यावी असे तहसिलदार अविनाश शिंगटे वैद्यकीय अधिक्षक डाॕ.बुशरा खान नोडल अधिकारी डाॕ.सुदाम लगास तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.विवेक कांबळे यांनी केले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहीती नूसार गंगापुर शहरात व तालूक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २१९७ झाली असून ग्रामीण भागात देखील रुग्ण वाढले आहेत शहरासह तालूक्यात कोरोणाचा शिरकाव झाला आहे शहरात रुग्णांची वाढ झाली असून आता गंगापुर मध्ये झपाट्याने रुग्ण पाॕजीटीव्ह येत आहेत . यात कोरोना मुळे मृत्युचा दर वाढला आहे.आतापर्यंत ( ६२ ) रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
गंगापुर शहरात (५१२) तर ग्रामीणचे ( १६८५ )कोरोना पाॕजीटीव्ह रुग्ण आढळून आले गंगापुर शहरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियाना कडून आलेल्या आरोग्य तपासणी पथकास नागरीकांची तपासणी करण्यात येत असल्याची माहीती तहसिलदार अविनाश शिंगटे मुख्याधिकारी संतोष आगळे वैद्यकीय अधीक्षक बुशरा खान नोडल अधिकारी सुदाम लगास तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.विवेक कांबळे यांनी दिली.
0 Comments