वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे पीक नुकसानाची पंचनामे तात्काळ करा छावा क्रांतिवीर सेनेची मागणी


पैठण ( विजय खडसन)-- 
जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये सातत्याने पडणारा पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मागील आठ दिवसापासून लागून असलेल्या पाऊस यामुळे पैठण तालुक्यातील अनेक भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
खरिपातील मूग, उडिदाची  तर अतिवृष्टीने अगोदरच माती केली आहे. त्यानंतर कापूस,तूर, मका, ऊस आदी पिकांचे खूपच नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत आहे.
नैसर्गिक आपत्तींना आपण थांबवू शकत नाही परंतु शासन - प्रशासन आणि लोकांमधील योग्य समन्वयातून त्यात होणारे नुकसान कमी करता येऊ शकते. परंतु असे समन्वय मात्र कुठेच दिसून येत नाही, अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पण पाहणी पंचनामे त्वरित करायला हवेत तशा सूचना .कृषिमंत्री दादासाहेब भुसे  यांनी दिल्या आहेत. त्यामुळे  झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश करत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अन्यथा सात दिवसाच्या आत आपल्या कार्यालयांमध्ये झालेले पिकाचे नुकसानीचे गाठोडे तसेच ऊस,कपाशी, तूर सर्व शेतमाल आणत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावने, भगवान सोरमारे, रवी हिंगे, स्वप्निल भोसले, महेश राजे भोसले, अविनाश उगले, संकेत दखणे,राजेंद्र कारेगावकर, कार्तिक बावणे आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments