अजित पवारांच्या तंबी नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग...


(निलेश जांबले दौंड)

पुणे...
     माती टाकून खड्डे बुजवण्याची प्रशासनावर आली नामुष्की...
    उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या नियमबाह्य वाहतूकीमुळे महामार्गाची दुरवस्था झाल्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा दावा....

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील पुणे सोलापूर हायवे वरील पाटस येथील बारामती फाटा ते वासुंदे फाटा (गुंजखिळा) हा महामार्ग खड्डेमय झाला असून प्रवाशांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे...
आज या महामार्गावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती कडे जात असताना रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधून तंबी दिली.व रस्ता वाहतुकीलायक बनवण्याच्या सूचना दिल्या....
   मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड मधील कार्यालयातील प्रशासनास वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करताना पुरती दमछाक झाली.व अजित पवारांचा शब्द पाळण्यासाठी चक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर माती टाकून खड्डे बुजवून अजित पवारांचा शब्द पाळण्याचा प्रयत्न केला आहे....
याप्रश्नी सार्वजनिक बांधकाम विभाग दौंडचे उपकार्यकारी अभियंता हरिचंद्र माळशिकारे यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठांच्या सूचनेनुसार महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने वाहतुकीलायक करण्यात येत आहे,आज तात्पुरती मलमपट्टी म्हणुन माती मुरुम टाकून खड्डे बुजवून घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या महामार्गावर दुरुस्ती साठी निधी उपलब्ध नाही असेही माळशिकारे यांच्या कडुन  सांगण्यात आले. तसेच या कामासाठी थोड्या दिवसात प्रयत्न करून महामार्ग बनवण्यासाठी तत्पर राहिन असेही माळशिकारे यांच्याकडून सांगण्यात आले..
     मात्र या महामार्गावरून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जातो दरवर्षी याच महामार्गावर स्पेशल रिपेरिंग साठी निधी उपलब्ध करून देण्यात येतोय तरीही महामार्गावरील परिस्थिती कायम खड्डेमय झालेली असतेय त्यामुळे स्पेशल रिपेरिंग चा निधी कोणाच्या घरात जातोय असा सवाल स्थानिक करत आहेत तसेच ठेकेदार व अधिकारी यांच्यातील पुतना मावशीचे आर्थिक तडजोडीचे प्रेम यावरुनच दिसुन येते आहे...

Post a comment

0 Comments