पैठण (प्रतिनिधी विजय खडसन)--
: कारोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण कसे सुरू ठेवता येईल या संदर्भात शिक्षकांना आॅनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी मुनोत विद्यालय यांनी शिक्षकांची आॅनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका सुरेखा सुतार यांनी प्रशिक्षणाचे आॅनलाइन प्रास्ताविक करून प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला.
यावेळी अविनाश गर्डे यांनी झूममिट, गुगलमिट, यासंदर्भात आॅनलाईनरीत्या प्रत्यक्ष डेमो व पीडीएफ दाखवून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन केले व शंकांचे निरसन केले. या प्रशिक्षणासाठी सुतार सुरेखा , शिंदे गणेश, पालवे शैलेश, सराटे ज्ञानोबा , उज्वला जाधव, कविता पाटील, उल्का नवगिरे, पोरे अशोक, वाडेकर मल्लिकार्जुन, नितीन खेडकर, सुप्रिया मुप्पिडवार, सहभागी झाले होते. आभार सुतार सुरेखा यांनी मानले
0 Comments