कातपुर येथिल प्राथमिक आरोंग्य उपकेंद्र असुन अडचण नसुन खोळबा ,[आरोंग्य उपकेंद्रा भोवती घाणीचे साम्राज्य फक्त लसीकरणालाचं कर्मचारी


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:— पैठण तालुक्यातील कातपुर येथिल प्राथमिक आरोंग्य उपकेंद्र असुन आडचण नसुन खोळबा कातपुर येथिल आरोग्य केंद्र फक्त नावालाचं आहे या उपकेंद्रातील .कर्मचारी मुख्यालयी तर राहातचं नाहित.परतू त्याचे दर्शन फक्त लसीकरणाच्या दिवशीच होते.
या उपकेंद्रात लसीकर गरोदर मातांची तपासणी प्रसूती या सुविधा आहेत परतू या उपकेंद्रात महिन्यांत फक्त लसीकरण केले जाते . सुविधा दिली जात नाही तसेच प्रसूती केली जात नसल्याने संबधित कातपुर गावातील लोकांनी सागितले आहे.तसेच या ठिकाणी मुख्यालयी कोणीचं राहात नसल्याने राञी अपराञी गरोदर मातांना तालुक्याच्या किवा पिपंळवाडी (पी) या ठिकाणी गरोंदर मातानां जावे लागते. यामुळे नेमके हे  आरोंग्य उपकेंद्र नेमके कशासाठी हा प्रश्न उपस्थित होतो.आरोंग्य सेवक व सेविका आसे मिळुन दोनचं जण संबधित उपकेंद्रात आहेत .परतू आठवड्यात एकचं दिवस कर्मचारी उपकेंद्रात काही वेळे पुरतेच येतात व निघुन जातात.मुळ कातपुर गावातील आरोंग्याचा कणा असलेल्या आरोंग्य केंद्रात कुठलीचं सुविधा उपलब्ध नाही.कातपुर येथिल रुग्णांची खुप मोठी गैरसोय होते.येथे अालेल्या रुग्णांनी संबधित कर्मचार्‍यांना फोन केला आसता त्यांना पिपंळवाडी (पी  )ची येथिल केंद्रात जाण्याचा सल्हा  दिला जातो.एकीकडे आरोंग्यासाठी शासन एवढा खर्च करुण सुविधा पुरवण्यासाठी आदेश देतात परतु कातपुर येथिल प्राथमिक आरोंग्य उपकेंद्रात माञ याला केराची टोपली दाखवली जाते. गावकर्‍याच्या 
आरोंग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे.आरोंग्य उपकेंद्रात मोठ्या प्रमाणात गवत,वेड्या बाभळी,कचरा,साचला आहे व पाण्याचे गटार ,तुबलेले असल्यामुळे येथे डास व  तसेचं दुर्गंधीही दिसुन येते. 
 

  
फक्त महिन्यात लसीकरणसाठी कर्मचारी एक दिवस येतात.परतु आरोंग्य उपकेंद्र कधीचं उघडे दिसत नाही.कातपुर गावातील महिलांसह इतर ठिकाणी रुग्णांना नाईलाजाने पैठण किवा पिंपळवाडी ( पी )ची येथे प्रस्तुतीसाठी जावे लागते.... संजय पा. मोरे ....गावकरी कातपुर

Post a comment

0 Comments