सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी


सिल्लोड  , सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द  येथे गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी मोढा खुर्द  येथील गावक-यांनी निवेदन देऊन सिल्लोड ग्रामीण पोलीसांकडे केली आहे. या निवेदनावर गावक-यांनी सह्या करून निवेदन देण्यात आले. मोढा येथे अवैध दारू विक्री मुळे गावात रोज एक ना एक भांडण तंटे होत आहे. व गावातील अठरा वर्षांपासुन ते पन्नासी ओलांडले पुरूष दारू पिऊन गावात रोज धिंगाणा घालत असल्याने गावातील नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे. या अवैध दारू विक्री मुळे नवतरुण रोज सकाळ पासून दारू पितात व आपापल्या घरी घरच्यांना नाहक त्रास देतात यामुळे महिलांना या दारूडयांमुळे घरी रोज भांडण होत असल्याने महीला वर्गा तर्फे तर या अवैध दारू विक्री करणाऱ्यांला अटक करून त्यांना दम द्यावा अशी मागणी मोढा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी  तर्फे केली आहे. मोढा खुर्द  येथील अवैध दारू विक्री बंद असे निवेदन देण्यात आले


मोढा खुर्द येथे सुरू असलेली अवैध दारू विक्री शंभर टक्के त्वरित बंद करून अवैध दारू विक्री करणाऱ्याचा ताबडतोब बंदोबस्त करून यापुढे गावात अवैध दारू विक्री होणार नाही याची खात्री देतो 

 श्री किरण बिडवे  - पोलीस निरीक्षक

सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन

Post a comment

0 Comments