नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा - भाजपा युवा जिल्हाध्यक्ष सुरज लोळगेपैठण ( विजय खडसन )

पैठण तालुक्यात सतत होणाऱ्या वादळी आतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचा घाट न घालता शेतकऱ्यांना तात्काळ थेट मदत करावी नसता भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलनाचा इशारा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष सुरज लोळगे यांनी पाहणी दरम्यान दिला आहे.
अतिवृष्टीमुळे, फळबागा,कपाशी- तूर,मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी उध्वस्त झालेला आहे.शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी

      भारतीय जनता पार्टी  वतीने मुलांनी - वडगाव तालुका पैठण येथे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यात आली या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय  औताडे, जिल्हा सरचिटणीस श्री.लक्ष्मण औटे, तालुकाध्यक्ष श्री.सुनील शिंदे, जिल्हा चिटणीस श्री.तुषार सिसोदे ,किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.कल्याण(नाना) गायकवाड  बंबन मिसाळ,यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रीया

पैठण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे फळबाग,तुर,मका, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी उध्वस्त झालेला आहे शासनाने पंचनामा न करता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी

           सुरज लोळगे 
   जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा  
      तथा नगराध्यक्ष पैठण

Post a comment

0 Comments