वादळी वाऱ्यासह शेतकऱ्यांचे मोठे नुकसानकन्नड तालुक्यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून पाहणीकन्नड : कन्नड तालुक्यातील सारोळा,  नाचनवेल, पिशोर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिके जमीनदोस्त झाले आहे. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेने थेट बांधावर जाऊन दिलासा दिला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पाहणी करून पंचनामे करण्याची सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
   हाताशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले. मोठा खर्च करून औषधी - खते, बी बियाणे आदींचे डोक्यावर कर्ज असतांना हा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  कापूस, मका, बाजरी आणि भाजीपाला आदी पिके जमीनदोस्त  झाल्याने तातडीने मदतीची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.
यावेळी आमदार उदयसिंग राजपूत,  उपजिल्हाप्रमुख अवचित वळवले, तालुकाप्रमुख केतन काजे, डॉ. अण्णासाहेब शिंदे, उपतालुकाप्रमुख दिलीप पिंपळे, युवासेना तालुका युवाधिकारी उमेश मोकाशे आदींसह तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments