अनेक वर्षा पासून रखडलेल्या पैठण संतपीठाचा प्रश्न लागणार मार्गी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या दौऱ्यावर अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ


        
पैठण ( प्रतिनिधी विजय खडसन)--

 संतपीठासाठी शासनाने दक्षिण काशी म्हणून नावाजलेल्या पैठण तीर्थक्षेत्राची निवड केलेली आहे. असे असतांनाही संतपीठाचा प्रश्न मागील 37 वर्षापासून रेंगाळत पडला आहे. मराठवाडा 42 विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेले संतपीठ प्रत्यक्षात उद्घाटनानंतरही सुरू होऊ शकले नाही. ही धक्कादायक व आश्चर्यचकित करणारी बाब आहे. 

*संतपीठ चालू करण्यामागचा शासनाचा हेतू*

         समाजाशी माणसाचे नाते, राष्ट्रीय व सामाजिक कार्याची दिक्षा मानवाला लाभली पाहीजे, सत्य उमजले पाहिजे आणि आत्महिताबरोबरच लोकहीत साधले पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता, परोपकार, मानवधर्म जागृती याच्या आधारावर समाजविकास करणे, संतसाहीत्याचा व संतांचा, विविध धर्म प्रवर्तकांचा उदात्त मानवतावादी विचारांचा प्रसार करणे, संतसाहीत्यातील सद्गुण माणसात बिंबविणे, परधर्म सहिष्णुतेच्या विचार जोपासने व स्वधर्माच्या उदात्त विचाराकडे लक्ष वेधणे, राष्ट्रीय एकात्मता व परधर्म सहिष्णुता समाजामध्ये रुजवणे ईत्यादी संतपीठाची मुख्य कार्य रहाणार आहे. प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन असे परीक्षेचे तीन स्तर संतपीठाच्या अभ्यासक्रमातुन रहाणार असुन तद्नंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सोयही करण्यात येणार असल्याचे समजते. अभ्यासक्रम शिक्षणाचे माध्यम मराठी रहाणार आहे. 

*संतपीठ इमारत उभा राहिल्या नंतरचा घटनाक्रम*  

◆ सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. संजय देवतळे यांच्या हस्ते संतपीठ इमारतीचे उद्घाटन दि. 13 फेब्रुवारी 2014 रोजी झाले.
◆शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली संतपीठ चालविले जाईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंञी विनोद तावडे यांनी दि. 26 आॅक्टो. 2015 रोजी आळंदीत केली. 
◆ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चोपडे यांनी पैठण येथील संतपीठ जुन 2016 पासुन सुरु करण्यात येईल अशी घोषणा पैठण येथे दि. 5 फेब्रुवारी 2016  ला केली. 
◆ संतपीठ त्वरित सुरू करावे म्हणून मराठवाडा विकास सेनेचे संस्थापक सुभाष पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत पैठण येथे दी. 3 फेब्रुवारी 2018 रोजी शिवाजी चौकात धरणे आंदोलन केले. 
◆ संतपीठ कामाला गती मिळावी म्हणून विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मे/जुन 2018 मध्ये औरंगाबाद येथे बैठक घेतली. 
◆ संतपीठ त्वरित सुरू करावे म्हणून मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते अॅड. प्रदीप देशमुख, सुभाष पाटील व दिनेश पारीख यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांची दि. 3 जुलै 2018 रोजी भेट घेऊन निवेदन देऊन मागणी केली. 
◆विधानसभा अध्यक्ष मा. श्री हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन नागपुर येथे दि. 10 जुलै 2018 रोजी झालेल्या बैठकीत पैठण येथील संतपीठ जुन 2019 पासुन सुरु करण्याची कार्यवाही शासनाने करावी असा निर्णय झाला.

-------------चौकट------------------
अद्याप सुरु न होऊ शकलेले संतपीठ व रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे प्रयत्न व नेतृत्वाने येत्या जानेवारी 2021 पर्यंत संतपीठातील काही अभ्यासक्रम सुरु करण्यात येईल, ज्या साठी ही इमारत बांधली गेली त्यासाठीच या इमारती चा उपयोग व्हावा यासाठी आपण पावले टाकत असून आता पर्यंत मतमोजणी साठीच या इमारतीचा उपयोग झाला आहे, आता मा. रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वा खाली याचा कायापालट होणार असल्याचे मा. ना.उदय सामंत यांनी आश्वासन नाही, तर अभिवचन  दिले. जानेवारी २०२१ मध्ये संतपीठ चालू असणार अशी  ग्वाही  दिली. 


यावेळी उपस्थित उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार आंबादास दानवे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उपविभागिय पोलीस अधिकारी गोरख भामरे, पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पैठण न.प.चे स्वच्छता सभापती भुषण कावसनकर यांच्या सह  काही मोजकेच  अधिकारी उपस्थिती होती

चौकट

सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या महत्त्वाच्या शासकीय दौरऱ्यात पाठ फिरवल्याचे चित्र पृकषाने पहायला मिळाले .यावेळी उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली

Post a comment

0 Comments