प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी रमेश शितोळे....


निलेश जांबले दौंड-पुणे,
प्रहार जनशक्ती पक्षाच्या दौंड तालुका अध्यक्ष पदी रमेश शितोळे यांची निवड करण्यात आली शितोळे यांच्या निवडीने गोरगरीब उपेक्षित दिव्यांग घटनाकांना न्याय मिळणार असून त्यांच्या निवडीबद्दल परिसरामध्ये कौतुक होत आहे.  राज्यमंत्री  बच्चू कडु यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय पिंपरी चिंचवड, पुणे येथे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
यावेळे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख यश अजय महाराज बारस्कर, पुणे जिल्हा संघटक निरज कडू , पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे , दारू बंदी कृती समितीचे अध्यक्ष मंगेश फडके उपस्थित होते . रमेश शितोळे गेली १० वर्षापासून दौंड तालुक्यात दारु बंदी साठी प्रयत्न करीत असुन . हजारो तरुणांना व्यसनातून मुक्त केले आहे .त्यांनी २०१९ ची दोंड विधानसभा प्रहार जनशक्ती पक्षा कडुन लढविली आहे.पक्ष बळकटी गोरगरीब, दिव्यांगासाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
तसेच, आमदार बच्चु कडू यांची व पक्षाचे ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी, कामगार, गोर-गरीब, शोषित, अपंग, पीडित यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे व कटिबद्ध राहू असे मराठा तेज न्युजशी बोलताना सांगितले.

Post a comment

0 Comments