नाथसागर जलाशय ओव्हरफुल सर्व २७ दरवाजे उघडले गोदावरीत विसर्ग सुरू.....पैठण ( विजय खडसन )---

 जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अति वृष्टी झाल्याने वरचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने  जायकवाडी धरणामधून आज दिनांक 18/09/2020 ठीक पहाटे 3:30 ते 4:00 वा. दरम्यान गेट्स क्र.1,9,5,3,7,2,8,4,6 असे एकुण 9 गेट 1.5 फुट उंचीवरुन 2.0 उंचीवर करण्यात आले आहे व  94320 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदी पात्रात वाढविण्यात आला आहे.
1) 4.0 फुटाने उघडण्यात आलेल्या गेटचे क्रमांक :- 10,27,18,19,16,21,14,23,12,25,11,26,13,24,15,22,17,20.
2) 2.0 फुटाने उघडण्यात आलेल्या गेटचा क्रमांक :- 1,9,5,3,7,2,8,4,6 (आपत्कालीन व्दार)
          सद्यस्थितीत सांडव्यातुन 89604+4716=94320 क्यूसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरु आहे.
------------------------------
त्यामुळे प्रशासनाने गोदावरी नदीकाठच्या गावाना या आवाहनाव्दारे सूचीत करण्यात येते की नदीपात्राजवळ चल मालमत्ता,चीज वस्तु ,वाहने,  जनावरे, पाळीवप्राणी , शेती आवजारे व इतर साधने असल्यास सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे . नदीपात्रात कोणीही जाऊ नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता  पैठण व  गोदावरी काठच्या गावकऱ्यानी घेण्यात यावी असे आवाहन  पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी केले  आहे.

*ऊर्ध्व धरणातील टक्केवारी ची स्थिती*

करांजला ८४.२५ टक्के
गंगापूर ९९.१३ टक्के
दारणा ९९.७९ टक्के
ओझर ७१ टक्के
पालखेड ९४.२७ टक्के
नांदूर मध्यमेश्वर ८१.७१ टक्के
कश्यपी ७१.८१ टक्के
गौतमी ८५.१७ टक्के
वाघाड ८६.३४ टक्के
पुनेगाव ९१.०६ टक्के
तीसगाव ७४.६५ टक्के
वालदेवी १०० टक्के
मुकणे ८३.२० टक्के
भावली १०० टक्के
भंडारदरा १०० टक्के
मुळा ९७.४० टक्के
निळवंडे ९७.६९ टक्के
हाडळा १०० टक्के
मंडओहल १०० टक्के
वाकी ९८.८० टक्के
भाम १०० टक्के
आळंदी ८९.५७ टक्के
--------------------
*जायकवाडीत वरच्या धरणातुन येणाऱ्या पाण्याची आवक*

१८ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.०० वाजता 

 दारणा ३३० क्यूसेक
नांदूरमध्यमेश्वर १६१४ क्यूसेक
वालदेवी १००७ क्यूसेक
मुळा २०००० क्यूसेक
मंडओव्हल ५३१ क्यूसेक
ओझर ४०८ क्यूसेक
भाम २५० क्यूसेक

*अश्या लहान मोठया धरणातून जायकवाडी धरणात एकूण आवक ५९,२८२ क्यूसेक*

*आपतकालीन दरवाजे क्रमान १ ते ९ उघडण्याची ही पाचवी वेळ आहे*
 सन २००५, २००६, २००७, २००८, नंतर तब्बल १२ वर्षांनी पहिल्यांदाच आपतकालीन दरवाजे उघडण्याची वेळ आज १८ सप्टेंबर २०२० ला आली आहे.असे बुध्दभुषण दाभाडे यांनी सांगितले आहे

*आपतकालीन दरवाजे क्रमांक १ ते ९ दोन फुटाने उचलून १८८६४ क्यूसेक तर दरवाजा क्रमांक १० ते २७ चार फुटाने उचलून ७५४५६ असा एकूण ९४३२० क्यूसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे*

 गोदावरी  नदीपात्रात केला जात आहे.
अशी माहिती पाटबंधारे वि भागाचे उपविभागीय अभियंता  अंकुर दांडगे यांनी दिली.

Post a comment

0 Comments