नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारावी व कोरोनामुक्त व्हावे यासाठी सिल्लोड तालुक्यात देवाला साकडे    सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.29, राज्याचे नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांना  कोरोनाची लागण झाली असल्याने ते कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी सिल्लोड तालुक्यात  शिवसेना व ना. अब्दुल सत्तार मित्रमंडळाच्या वतीने विविध मंदिरामध्ये आराधना करून देवाला साकडे घालण्यात आले.

. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्ष म्हणून व सरकारचे मंत्री म्हणून त्यांचे कार्य नेहमी समाजहितासाठी राहिले आहेत. मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कोरोना विरुद्ध लढतांना महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मदतकार्य केले. ना.एकनाथ शिंदे हे कोरोनाकाळात झटत असतांना दुर्दैवाने त्यांना कोरोना ची लागण झाल्याने ते उपचार घेत आहेत. हे वृत्त कळताच राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार मित्रमंडळ व तालुका शिवसेनाच्या वतीने ना. शिंदे यांची पृकृति सुधारून लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी तालुक्यातील श्री क्षेत्र मुरडेश्वर संस्थान केळगाव, श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज संस्थान,धोत्रा व दुर्गामाता मंदिर सिल्लोड येथे अभिषेक,प्रार्थना व महाआरती तसेच महामृत्युंजय जप करण्यात आला.

  यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल, तालुका प्रमुख देवीदास लोखंडे,शहर प्रमुख रघुनाथ घरमोड़े, शिवसेना शहर उपप्रमुख संतोष धाडगे, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, दत्ता भवर, मयूर शाह, दत्ता शेजुळ,,जी.प.सदस्या सिमाताई गव्हाणे, शिवसेना महिला आघाडीच्या दीपाली भवर, मेघा शाह ,ओमकार गिरी महाराज, कृउबा समिती संचालक दामुअण्णा गव्हाणेबद्रीनाथ कोठाळे, जगन कावले, भागवत मोरे,स्वप्नील माकोडे,नाना कोल्हे ,जयवंतराव कोल्हे व नामदार अब्दुल सत्तार मित्रमंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

Post a comment

0 Comments