वैजापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची छावा संघटनेची मागणी


वैजापूर( प्रतिनिधी/ राहुल त्रिभुवन) : 

औरंगाबाद जिल्ह्यासह वैजापूर तालुक्यात झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात ओला तांडव केला आहे. वैजापूर मध्ये शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे बघावयास मिळत  आहे.पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतला आहे. या सर्व गोष्टीकडे शासनाने लक्ष दयावे याकरिता अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन च्या वतीने वैजापूर तालुका अध्यक्ष किशोर मगर यांनी वैजापूर तहसीलचे नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना निवेदन दिले. 
संपूर्ण तालुका आज पाण्याखाली  आहे.तालुक्यातील धरणंही ओसंडून वाहत आहे. तालुक्यात  धरणं व प्रकल्प मागील वीस वर्षात भरली नाही ती यावर्षीच्या भरमसाठ पावसाने तुडुंब भरली आहे. पावसाने झालेल्या शेतमालाच्या नुकसानीने बळीराजा पूर्णपणे खचला आहे. 
        अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन तर्फे निवेदनात म्हटलं आहे की संपूर्ण तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा व शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. पावसामुळे कपाशी, मक्का, बाजरी,भुईमूग, सोयाबीन व भाजीपाला सडल्यागत झाले आहे त्यामुळे हेक्टरी पन्नास हजाराची मदत करावी. या प्रमुख मागण्यासह छावा संघटनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा तहसील प्रशासनाला दिला आहे.
 संघटनेचे अनिल पवार, कैलाश दादा पवार, मनोज नळे, वकील अनिलकुमार बागुल, भीमा काळे, ऋषिकेश काकडे, प्रणव किशोर मगर, दीपक विठ्ठल काकडे आदी पदाधिकारी निवेदन देते वेळी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments