आमदार प्रशांत बंब यांच्या घरा समोर ढोल बजाओ आंदोलन,गंगापूर ( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )

लासुरस्टेशन येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार प्रशांत बंब यांच्या घरा समोर  ढोल बजाओ आंदोलन करण्यात  आले असून मराठा आरक्षना बाबत जो अध्यादेश अजून निघालेला नसून आमदार बब  यांनी विधानसभेत मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून संसदेत ५०/टक्कयची मर्यादा वाढवून तो सूची  9 मद्धे टाकून संरक्षन देण्यात यावे जेणे करून ते आरक्षण कोर्टात टिकेल हा मद्दा मराठ आरक्षणाचा  उपस्थित करून लवकर मागणी करावी

 यासाठी लासुर स्टेशन येथील नितिन पाटिल जाधव संतोष पाटील जाधव,बबलू पाटील पोळ, नितीन पाटील कांजूणे,बाबासाहेब पाटील सोमोसे, राहुल थोरात,मनोज पाटील सुराशे,गणेश पाटील सोनवणे, बबलू पाटील पवार,दिगंबर पाटील पवार,संतोष पाटील काळे,अमोल पाटील काकडे,विजय पाटील भाले, संदीप पाटील सांळूके,बापूसाहेब देशमुख,जनार्दन पाटील तायडे, कृष्णा पाटील पऱ्हाड,दादासाहेब पाटील औताडे यांनी आंदोलना मध्ये सहभागी होऊन आंदोलन शांतपणे पार पाडले
त्यावेळी शिल्लेगाव ठाणेचे पोलीस पिआय रविन्द्र खांडेकर  यांना निवेदन देण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त होता

Post a comment

0 Comments