कोविड सेंटरला व्हेंटिलेटरची सुविधा पुरवा ... आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी


 पैठण (प्रतिनिधी विजय खडसन)--

  पैठण तालुक्यातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . तालुक्यातील कोणत्याही कोविड सेंटरला ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची सुविधा उपलब्ध नाही . पैठण शहरातील खाजगी रुग्णालयातही सुविधा उपलब्ध नाही . त्यामुळे अत्यावश्यक रुग्णांना 50 किलोमीटरवर असलेल्या औरंगाबाद येथे जावे लागते .त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तात्काळ कोविड सेंटर ला प्रेशर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याची मागणी दत्तात्रय गोर्डे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे .   औरंगाबाद शहरात सुद्धा कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे .त्यामुळे तालुक्यातील औरंगाबाद येथे पाठवलेल्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर तातडीने मिळत नसल्याने रुग्णांचा जीवन मरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . त्यामुळे पैठण तालुक्यातील कोरोना सेंटरला ऑक्सिजन व व्हेंटिलेटर तात्काळ पुरवण्यात यावे अशी मागणी दत्ताभाऊ गोडे यानी  मंत्री  राजेश टोपे यांच्याकडे करण्यात आली आहे .

Post a comment

0 Comments