बाबरी विद्ध्वंस प्रकरणाचा निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव आज निवृत्त होत आहेत.

लखनौ : बाबरी विध्वंसक प्रकरणाचा निकाल देणारे सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे  न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव आज निवृत्त होत आहेत. त्यांनी आपली निवृत्तीच्या आधी या ऐतिहासिक प्रकरणावर निकाल सुनावला. या प्रकरणी न्यायमूर्ती एस. के. यादव यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

सुरेंद्र कुमार यादव मागील वर्षी ३० सप्टेंबरलाच निवृत्त होणार होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने १९ जुलै रोजी त्यांच्या कार्यकाळात वाढ केली. त्यानुसार बाबरी मशीद विद्ध्वंस प्रकरणाचा निकाल सुनावणीपर्यंत हा कार्यकाळ वाढवण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने देखील अधिसुचना काढत न्यायमूर्ती यादव यांचा कार्यकाळ वाढवला होता.
 

Post a comment

0 Comments