मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढावा -संभाजी ब्रिगेड...


निलेश जांबले दौंड-पुणे

मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड दौंड यांच्या वतीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दौंड तहसील कार्यालया मार्फत  निवेदन देण्यात आले आहे....मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी दिनांक 9 सप्टेंबर 2020 रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षणाबाबत स्थगिती दिलेली आहे..‌. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला याचा सर्वच क्षेत्रात फटका बसणार आहे...
मराठा समाज आरक्षणापासून कायमचं वंचित राहिलेला आहे.मराठा आरक्षणाबाबत कोणताही निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्वरुपाची शासकीय नोकर भरती करण्यात येऊ नये, तसेच मराठा आरक्षण लागू असलेले सध्याचे आरक्षण कायम ठेवण्याचा आध्यादेश सरकारला काढता येतो तो अध्यादेश सरकारने त्वरित काढून मराठा आरक्षणाचा लाभ मराठा समाजात कायम चालू ठेवावा या प्रमुख मागणीसह मराठा समाजात लागू असलेले सध्याचे शासकीय-निमशासकीय शैक्षणिक आरक्षण कायम ठेवून मराठा समाजाची होणारी फरपट थांबवण्यासाठी शासनाने प्रयत्न करण्याचे गरजेचे आहे. अशा विविध मागण्या सह दौंड तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले...
समाजाच्या मागण्यांचा शासन दरबारी विचार न झाल्यास आगामी काळात संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुनील पासलकर यांनी दिला...

तर मराठा समाजावर राजकीय पोळी भाजण्याच्या हेतुने होत असलेला अन्याय,समाजाची होत असलेली फरपट आणि भविष्यातील समाजातील होणाऱ्या तरुणांचे शैक्षणिक शासकीय-निमशासकीय नोकरीतील तोटे पाहता येणाऱ्या काळात काळ बघून निर्णय घ्यावा लागेल असे सूचक वक्तव्य मराठा सेवा संघाचे दत्ताभाऊ जांबले यांनी केले आहे
यावेळी सुनील पासलकर दौंड तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, गणेश भोसले दौंडअध्यक्ष शहर संभाजी ब्रिगेड, उपशहराध्यक्ष अमोल पवार,दौंड तालुका उपाध्यक्ष कुलदीप गाढवे, संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस विजय भोसले,संभाजी ब्रिगेड दौंडचे पदाधिकारी, तसेच मराठा सेवा संघाचे दत्ताभाऊ जांबले, केतन भापकर, किरण गायकवाड, सोमनाथ मोरे, विकास गायकवाड, संदीप शितोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते....

Post a comment

0 Comments