ग्रामपंचायत दादेगाव जहाँ. चे ग्रामस्थानी केले लाक्षणिक उपोषणपैठण (विजय खडसन)--

पैठण -  पैठण तालुक्यातील मौजे दादेगाव जहाँ. ता.पैठण येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येथील राहिवाश्याचे जगणे कठीण झाले आहे. वारंवार पत्र व्यवहार करून ही प्रशासनाने दादेगाव जहाँगिर येथिल . या गावकऱ्याच्या समस्या काही दूर झाल्या नाहीत, म्हणून तेथील ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयासमोर  लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. निवेदनात त्यांनी दादेगाव जहाँगिरच्या  रस्ताच्या कामाला मंजुरी देण्यात यावी. ड्रेनेज चे काम त्वरित व्हावे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून गावात ठिकठिकाणी सरकारी नळाची उपाययोजना करण्यात यावी. गावलागतच्या वस्त्यांना नागरी सुविधा देण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी आज पैठण येथिल पंचायत समिती समोर  लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता भाऊ गोर्डे, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, अप्पा गायकवाड, सजीव कोरडे, भाऊसाहेब पिसे, गणेश पवार, दिलीप सोनटक्के, सागर पोटफोडे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ नजन, महादेव भोसले, सुधाकर भोसले, सिद्धेश्वर भुतेकर, एकनाथ खैरमोडे, किरण भोसले, करण वाव्हाळ, ज्ञानेश्वर सोळुंके, सुभाष घोरपडे, नामदेव जाधव व  गांवकरी  उपस्थित होते.

Post a comment

0 Comments