कोरोना चाचण्यांचे दर पाचशे ते सातशे रूपयाने स्वस्तराज्य शासनाने घेतला महत्तवपूर्ण निर्णय सोलापूर/गणेश गांडूळे : राज्यातील कोरोनाग्रस्त रूणांची मोठी वाढ पाहता शासनाने दिलासा दिला असून कोरोना चाचणीसाठी एनएबीएल आणि भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (आयसीएमआर) मान्यता दिलेल्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्यांचे दर आणखी कमी केले आहेत.चाचणीची फी जास्त असल्याने आधी लोक चाचणी करण्यास टाळाटाळ करक असत.त्यामुळे पूर्वीच्या दरापेक्षा हे दर पाचशे ते सातशे रूपयांनी स्वस्त झाले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले आहे.तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही याबद्दल फेसबुक पेज वर दिली आहे.
 सामान्य जनतेला परवडणारे कोरोना चाचण्यांचे दर असावेत, अशी मागणी येत असल्याने राज्य शासनाने दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल शासनाला सादर झाला असून त्यानुसार कोरोना चाचण्यांचे दर आकारले जाणार आहेत.यातूनच कोरोनाला प्रतिबंध घालणे शक्य होणोर आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यातील औद्योगिक संस्था, औषध निर्माण संस्था सुरू झाल्या आहेत. परिवहन सेवाही सुरू झाली असून चाचण्यांसाठी रिएजंटस, व्हीटीएम कीट, पीपीई कीट, एन95 मास्क, आरएनए एक्स्ट्रॅक्शन की जेम पोर्टलवर माफक दरात उपलब्ध झाले आहे.याच्याही दरात मोठी तफावत होती ,ते दर आता कमी करण्यात आले आहेत.आयसीएमआरने उत्पादक कंपन्यांना मान्यता दिल्याने उपलब्धता वाढली आहे. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची संख्याही वाढली आहे. 
 यामुळे कोरोना चाचण्यांचे सुधारित दर निश्चित करण्याचे शासनाने ठरविले आहे. कोणत्याही प्रयोगशाळेला सुधारित दरांपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत, असा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे. 
 सुधारित आणि पूर्वीचे दर खालीलप्रमाणे
• संकलन केंद्रातून नमुने घेऊन तपासणी- 1200 रूपये (पूर्वीचे-1900 रूपये)
• दवाखाने, क्वारंटाईन सेंटरमधून नमुने घेऊन तपासणी-1600 रूपये (पूर्वीचे-2200 रूपये) 
• रूग्णांच्या घरून नमुने तपासणी-2000 रूपये (पूर्वीचे-2500 रूपये)
यामुळे आता सामान्य लोकोंना दिलासा मिळाला आहे.या महत्तवपूर्ण निर्णयाचे नागरिकातून स्वागत होत आहे.

Post a comment

0 Comments