माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेत सहभागी होवून कोरोनाला हद्दपार करा - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे जनतेला आवाहन


        सिल्लोड ( प्रतिनिधी )  राज्यमंत्री. अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील ग्रामविकास विभागांतर्गत भवन व भराडी पंचायत समिती गणातील विविध गावात जवळपास 5 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा तसेच सरकारच्या 'माझे कुटुंब माझे जबाबदारी ' या मोहिमेचा शुभारंभ महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाला.

   कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.अर्थ व्यवस्था डबघाईला आली. आज सरकारचा सर्वाधिक खर्च हा कोरोना ग्रस्तांसाठी खर्च होत आहेत. कोरोनाच्या संकटात प्रथम लोकांचे प्राण वाचविणे हे सरकारचे ध्येय आहेत. जगातील अनेक देश कोरोनामुळे हतबल झाले असतांना महाराष्ट्रात  विविध विकास कामांना गती देण्याचे काम सरकार कडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिल्ल्लोड मतदारसंघात आज विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे असे स्पष्ट करीत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या माझे कुटुंब माझे जबाबदारी या मोहिमेत सहभागी होऊन या मोहिमेत स्वतःची आरोग्य तपासणी करून कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी नियमांचे पालन करावे असे आवाहन. अब्दुल सत्तार यांनी विविध गावात उद्घाटन प्रसंगी केले.

कार्यक्रमात जि.प. अध्यक्ष रामुकाका शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख देवीदास पा. लोखंडे, डॉ.मच्छिंद्र पाखरे,  डॉ संजय जामकर, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे ,नरसिंग चव्हाण , अजिंठा सरपंच दुर्गाबाई पवार ,शिवसेना सिल्लोड शहर प्रमुख रघुनाथ घरमोडे, नाना कळम ,सुदर्शन अग्रवाल, प.स.माजी सदस्य उत्तम शिंदे, हरिदास ताठे, दत्ता भवर, नगरसेवक सुधाकर पाटील, विठ्ठल सपकाळ , राजु गौर,प्रशांत शिरसागर,शेख सलीम हुसेन, संजय मुरकुटे , विनोद भोजवानी, अक्षय मगर ,हनीफ मुलतानी यांच्यासह उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील ,गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे , पुरवठा नायब तहसीलदार संजय सोनवणे,पानी पुरवठा विभागाचे उपअभियंता रमेश कोईलवार, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता कल्याण भोसले ,आर. एस. पवार, प्रधानमंत्री सडक योजनेचे सुनील गुडसूरवार आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भराडी गणातील विविध गावांत  शुभारंभ करण्यात आलेले विकास कामे

  मंगरूळ फाटा ते डोंगरगाव कडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करणे 13 लक्ष,  सासुरवाडा येथे स्मशानभूमी शेड व सुशोभीकरण  करणे 5 लक्ष,  सासुरवाडा येथे गावांतर्गत नळ लोखंडी ट्यूब लेक्स  करणे 10 लक्ष,  चांदापूर येथे हाईमास्ट लाईट बसविणे 5 लक्ष,  मंगरूळ येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे 7 लक्ष , मोढा बुद्रुक येथे गावापासून ते संतोष काळे यांच्या शेताकडे जाणारा रस्त्याचे सिमेंट काँक्रेट करणे 5 लक्ष मोढा बुद्रुक येथे गावांतर्गत मंदिरा समोरील परिसरात हायमास्ट बसविणे 5 लक्ष,  मोढा  बुद्रुक ते आधारबन रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 25 लक्ष, वांगी खुर्द येथे मंदिरासमोर सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 5 लक्ष,  वांगी खुर्द येथे कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे 5 लक्ष, भराडी येथे हायमास्ट लाईट बसविणे 10 लक्ष , भराडी येथे कब्रस्तानचे सुशोभीकरण करणे व पत्र्याचे शेड तयार करणे 10 लक्ष, भराडी येथे फुले नगर मध्ये सामाजिक सभाग्रह बांधणे 7 लक्ष, भराडी येथे इंदिरा कॉलनीमध्ये पेवर ब्लॉक व ड्रेनेज लाईन करणे 10 लक्ष, भराडी येथे हुसेन नगर अंतर्गत पेवर ब्लॉक बसविणे 5 लक्ष, भराडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण करणे 3 लक्ष,  भराडी येथे घाटनांद्रा रोड ते  पशुवैद्यकीय दवाखाना ते आरोग्य उपकेंद्र कडे जाणाऱ्या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे 15 लक्ष , वडोद चाथा येथे मंदिर परिसरात हायमास्ट  लाईट बसविणे 5 लक्ष, वडाळा येथे मारुती मंदिरासमोर हायमास्ट लाईट बसविणे 5 लक्ष,  राज्यमार्ग 51 वांगी बुद्रुक जोड रस्त्याची सुधारणा करणे 30 लक्ष,  वांगी बुद्रुक येथे मारुती मंदिर ते लक्ष्‍मण साळवे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लक्ष , धानोरा येथे मारुती मंदिर ते स्मशानभूमी पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 5 लक्ष, वांजोळा येथे मंदिरासमोर सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 5 लक्ष , मोढा खुर्द येथे गावांतर्गत पेवर ब्लॉक बसविणे 7 लक्ष

भवन गणातील शुभारंभ करण्यात आलेले विविध कामे
   प्ररामा 5 ते बनकीन्होळा जोड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 15 लक्ष,  बनकीन्होळा येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता व पेवर ब्लॉक बसविणे 15 लक्ष, बनकीन्होळा येथे  गजानन महाराज मंदिर समोर पेवर ब्लॉक बसविणे 5 लक्ष, बनकीन्होळा येथे शहा कलंदर बाबा दर्गा जवळ हायमास्ट लाईट बसविणे 5 लक्ष, बाभूळगाव येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे 20 लक्ष, बाबुळगाव येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लक्ष,  बाभूळगाव ते गेवराई सेमी रस्त्यावरील नळकांडी फरशी पुलाची दुरुस्ती करणे 5 लक्ष, गेवराई सेमी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापासून ते जिल्हा परिषद शाळे पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लक्ष , गेवराई सेमी येथे  कचरू ताठे यांच्या घरापासून बाबुराव ताठे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लक्ष,  गेवराई सेमी येथे मारुती मंदिर ते कब्रस्तान पर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 5 लक्ष, केऱ्हाळा येथे मारुती मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लक्ष, केऱ्हाळा येथे सामाजिक सभागृह बांधणे 10 लक्ष,  केऱ्हाळा येथे ईदगाह परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे 5 लक्ष, प्रजिमा 14 पुलापासून ते कब्रस्तान कडे जाणारा जोडरस्ता सिमेंट रस्ता करणे 25 लक्ष, पळशी येथे हाईमास्ट लाईट बसविणे 7 लक्ष , भवन ते माळेवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 20 लक्ष , भवन येथे त्र्यंबक नगर मध्ये सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लक्ष, भवन येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लक्ष, भवन येथे गावांतर्गत एलईडी लाईट बसविणे 5 लक्ष , पिंपळगाव पेठ येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष, पिंपळगाव पेठ येथे गावांतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता करणे 10 लक्ष,  पिंपळगाव पेठ ते सिल्लोड रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 25 लक्ष, वरुड खुर्द येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे 15 लक्ष, पिंप्री येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे 10 लक्ष
असे जवळपास 5 कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले.

Post a comment

0 Comments