दौंड मधील वाळूमाफियांना मदत करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार - तहसीलदार संजय पाटील...

मराठा तेज न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट...

(निलेश जांबले )

दौंड-पुणे...

मलठण वाटलुज सह नदीपटृयातील  गावा-गावात मंडळअधिकारी सह गावकामगार तलाठी कोतवालच करताहेत वाळुमाफियाच्या यंत्रसामग्रीचे रक्षण...
दौंड तालुक्यातील रावणगाव मंडळातील अनेक गावांमध्ये भीमा नदीपात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाळू उपसा झाला असून,या अवैध वाळू उपशा मधून गुन्हेगारीला बळ मिळत असून दिवसेंदिवस तरुणाई गुन्हेगारीकडे वळत आहे.याच गुन्हेगारीतुन अवैध धंदे निर्माण करून आर्थिक माया मिळवून यातीलच काही हिस्सा शासकीय अधिकाऱ्यांना मिलीभगत म्हणुन देयचा आणि याच तडजोडीचा फायदा उचलत हे माफिया गुन्हेगारीकडे वळतात व याच गुन्हेगारीतुन काळी माया मिळवून त्या मायेतुन गुन्हेगारीचे प्रस्थ वाढवतात व गोरगरिबांनचे बळी घेतात....
त्यामुळे या प्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सभागृहामध्ये अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी निश्चित करून काम करावे असा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते... मात्र याच दौंड तालुक्यातील अधिकाऱ्यांचे काळे हात वाळूमध्ये गुंतले असून हेच वाळू माफिया ही वाळू रक्तरंजित बनवत आहेत.... व यांस सर्वस्वी महसूल विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी,तलाठी, कोतवाल, जबाबदार असून त्यांच्यावर ती कारवाई होणे गरजेचे आहे....
मात्र या अवैध वाळू उपशाला महसूल विभागाचे कर्मचारी पाठबळ देत असून वाळुमाफियांची नेहमीच पाठराखण करत असल्याचे सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत...अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती वरिष्ठ अधिकारी कारवाई का  करत नाहीत असे स्थानिक नेहमीच विचारत आहेत...
याप्रश्नी तहसीलदार संजय पाटील यांना विचारले असता आपण यापूर्वी त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेले आहेत,तसेच त्वरीत या संदर्भातील लेखी नोटीस देण्यात येईल व कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मराठा तेज शी बोलताना संजय पाटील यांनी दिले...

Post a comment

0 Comments